अरर! अनुष्काने स्वतःच स्वतःची केली फजिती, मग मागितली जाहीर माफी….

अरर! अनुष्काने स्वतःच स्वतःची केली फजिती, मग मागितली जाहीर माफी….
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक कलाकार चर्चेत येण्यासाठी किंवा आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी 4 काही ना काही अतरंगी गोष्टी करत असतात. मात्र आता अनुष्काला तिची हीच अतरंगी गोष्ट महागात पडली आहे. यासाठी तिला माफी देखील मागावी लागली आहे. अनुष्का शर्मा या अभिनेत्रीने क्रिकेटर विराट कोहली बरोबर लग्न केल्यानंतर ती विशेष प्रसिध्दीमध्ये आली.

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यात शाहरुख खान पासून ते रणवीर सिंग पर्यंत अनेक कलाकारांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. आता नुकतेच तिने एक अतरंगी प्रकार केला. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक बिस्किटांचे फोटो शेअर केले. एका पाठोपाठ एक बिस्किटाचा फोटो ती स्टोरीवर शेअर करत गेली. त्यात तिने अनेक बिस्किटांना स्वतःच नंबर देखील दिले. कुणाला 1 तर कुणाला 3 तर कुणाला 5 असे नंबर तिने दिले.

यावरून तिला कोणते बिस्कीट किती आवडते हे सांगण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र यावेळी तिच्याकडून एक सीली मिस्टेक झाली. या मिस्टेकमुळे तिने सगळ्यांची माफी देखील मागितली. तिच्या या चुकीने तिची चांगलीच फजिती झाली. तिने पोस्ट शेअर करत असताना एका बिस्किटाच्या फोटो खाली बिस्कीटचे स्पेलिंग चुकीचे लिहिले. मग काय हे नेटकऱ्यांच्या लगेच लक्षात आले. आणि मग अनुष्काला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

अनेक नेटकरी तिच्यावर हसू लागले. तुला साधं स्पेलिंग लिहिता येत नाही आणि तू नंबर देते असे म्हणत अनेकांनी तिच्यावर कमेंट केल्या आहेत. आता तिने हे सर्व पाहून इंस्टाग्रामवर आणखीन एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. तिने लिहिलं की, “माझी स्पेलिंग चुकल्यामुळे कुणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागते.

“असे तिने म्हटले आहे. अनुष्का साल 2018 मध्ये शारुखा खान बरोबर शेवटची झिरो या चित्रपटात दिसली होती. वामिकाच्या जन्मानंतर तिने अभिनयाला थोडा काळ राम राम ठोकला होता. मात्र अनेकांच्या दिलाची धडकन असलेली ही अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. सध्या ती युके मध्ये आहे. इथे ती चकदे एक्स्प्रेस या चित्रपटाच्या शुटींग साठी आली आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *