बीड मराठा मोर्चा : मेटेंची ग्वाही फोल; मोर्चात सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फज्जा

बीड मराठा मोर्चा : मेटेंची ग्वाही फोल; मोर्चात सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फज्जा
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

आज बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा निघणारच’ असा विश्वास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला होता.

त्याप्रमाणे बीडमध्ये या मराठा मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हजारो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. मात्र, जागतिक कोरोना संकटाचे भान मोर्चातील जनतेला नसल्याचं पाहायला मिळतंय. सोशल डीस्टांसिंग चा फज्जा उडाला आहे.

आम्ही प्रशासनाला सहकार्य करू परंतु, मोर्चेकऱ्यांची प्रशासनाने अडवणूक करू नये. कोरोनामुळे मोर्चेकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेणार असल्याचा दावा मेटे यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे चित्र सध्या बीडमध्ये दिसत नाही.

अगदी जवळ जवळ सर्व मोर्चातील मराठा बांधव उभे असताना पाहायला मिळतंय. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही. सोबतच सुरक्षित अंतर पाळले गेले नसल्याचही निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या हा संसर्ग वाढल्यास नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्न विचारल्या जात आहे.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *