“चंद्रमुखी” चित्रपटानंतर अमृताने दिली गोड बातमी, ऐकून तुम्ही देखील व्हाल खुश..!

“चंद्रमुखी” चित्रपटानंतर अमृताने दिली गोड बातमी, ऐकून तुम्ही देखील व्हाल खुश..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रा बनून अनेकांच्या दीलाची धडकन झाली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून बॉलीवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आता तिने तिच्या आयुष्यातील एक गोड बातमी प्रेक्षकांना दिली आहे. ही बातमी वाचून कदाचित तुम्ही देखील फार आनंदी व्हाल. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आजवर अनेक मराठी चित्रपट साकारले. तसेच बॉलीवूडच्या राजी या चित्रपटात देखील ती दिसली.

तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने लाखो प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता ती आणखीन एका बिग बजेट बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच तिने याची माहिती दिली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने एक पोस्ट शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. यात तिने लिहिले आहे की, “दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात लोभ, दहशत

आणि जीवन यातील अराजकतेवर आधारीत कथा असलेला लूटेरे लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. हा त्याचा फास्ट लूक.” असे तिने यात लिहिले आहे. तसेच तिने आगामी “लुटेरे” चित्रपटाचा टिझर देखील शेअर केला आहे. यात प्रचंड अफरातफर होताना दिसत आहे. तसेच एका जहजावर सुरू असलेला गोंधळ आणि चुकीचे कामे पाहायला मिळत आहेत. एका गोष्टीवरून यात एका जहाजात चोरी सारखी घटना घडत आहे.

तसेच सर्व व्यक्ती यात एका मिशनवर काम करत असताना भूकंप आणि खून अशा घटना घडताना दिसत आहेत. लुटेरे हा चित्रपट खऱ्या अर्थाने अंगावर रोमांच उभे करणारा वाटत आहे. अमृता देखील यात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच रजत कपूर यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच विवेक गोंबर, दीपक तिजोरी, चंदन रॉय सन्याल हे कलाकार देखील या चित्रपटात अभिनय करताना दिसतील.

हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी अमृताचे चाहते खूप खुश आहेत. अनेकांनी तिला तिच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचे कौतुक देखील करत आहेत.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *