अभिनेत्रीच्या फोटोवर मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड क्लीनबोल्ड; सायलीनेही दिलं हार्ट

अभिनेत्रीच्या फोटोवर मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड क्लीनबोल्ड; सायलीनेही दिलं हार्ट

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सलामीचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड यंदाच्या आयपीएलमध्ये मस्त फॉर्मात होता. आयपीएल अचानक अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. तसं आयपीएल मधील खेळाडू सोशल मीडियावर ॲक्टीव झालेले पाहायला मिळतंय.

मैदानात विविध बॉलर ऋतुराजची विकेट काढत असतात. मात्र, आता चक्क मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने आता ऋतुराज गायकवाडला क्लीनबोल्ड केल्याचं पाहायला मिळतंय. सायली संजीवच्या फोटोवरील ऋतुराजची कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने काही फोटो इन्स्टाग्रामवरील आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोवर ऋतुराज गायकवाडने ‘Woahh ♥️’ अशी कमेंट केली आहे. या कमेंटला सायलीने हार्टचा ईमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

ह्या कमेंट पाहून दोघांच्या चाहत्यांनी दोघांना डिवचन्याचा प्रयत्न केलाय. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट काढण्याचा प्रयत्न केलाय.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *