‘गदर’ मध्ये दिसणारा हा छोटा मुलगा कोण आहे जाणून घ्या, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये होणार त्याचे धमाकेदार कमबॅक!

‘गदर’ मध्ये दिसणारा हा छोटा मुलगा कोण आहे जाणून घ्या, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये होणार त्याचे धमाकेदार कमबॅक!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, एकेकाळी बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट गदरला आज 21 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. गदर या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आपल्याला पहायला मिळाले होते. या दोघांशिवाय या चित्रपटात सर्वाधिक लाइमलाइट मिळालेला गदर चित्रपटाचा चरणजीत.

हा तोच चरणजीत ज्याने या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. चरणजीतचे खरे नाव उत्कर्ष शर्मा आहे. आता उत्कर्ष 28 वर्षांचा आहे. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेला हा कलाकार या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.

गदर

22 मे 1994 रोजी महाराष्ट्रात जन्मलेला उत्कर्ष सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे पहायला मिळते. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या उत्कर्षने ‘अब तुम्हारे हवाले वतन साथी’मध्ये बॉबी देओलच्या यंग वर्जन ची भूमिका साकारलेली आपण पहिली होती. गदर या चित्रपटातून प्रसिद्ध झाल्यानंतर उत्कर्षचे वडील अनिल यांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते.

चार वर्षे परदेशात राहिल्यानंतर तो मायदेशी परतला आहे आणि उत्कर्षला हिरो म्हणून लाँच करण्याचे काम आता सुरू झाले आहे. अनिल शर्मा यांनी उत्कर्षला लाँच करण्यासाठी 2018 साली ‘जीनियस’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत इशिता चौहान, मिथुन चक्रवर्ती, नवाजुद्दीन सिद्दीकी, आयशा जुल्का आणि झाकीर हुसैन हे कलाकार दिसले होते.

उत्कर्ष याने 2015 साली ‘पर्पज’ आणि ‘होम’ नावाच्या दोन शॉर्ट फिल्म देखील बनवल्या आहेत. या चित्रपटांमध्ये त्यांने दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम केले आहे. हा 27 वर्षीय अभिनेता यावेळी लाखो मुलींच्या हृदयाची धडकन बनला आहे. आणि आता तब्बल 21 वर्षांनंतर ‘गदर एक प्रेम कथा’ चित्रपटाचा सीक्वल येत आहे.

त्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. गदर पार्ट 2 चित्रपटात मध्ये उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार असून, काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरील शूटिंगचे फोटोही समोर आले होते. त्या फोटोंमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल देखील दिसत आहेत.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *