कितीतरी आजारांपासून सुटका मिळते फक्त 1 महिना रोज 1 डाळिंब खाल्ल्याने काय आहेत फायदे जाणून घ्या !

डाळिंब हा फळ आपल्या शरीरासाठी इतक्या मोलाचे काम करतो वाचून थक्क व्हाल. त्याच्या आतील दाणे लाल बूँद मोत्यासारखे पाहूनच खायची इच्छा कोणाला नाही होणार हाच डाळिंब कितीतरी व्हिटॅमिन जीवनसत्व आणि खनिजानी भरलेला आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल यात भरपूर प्रमाणात लोह असते त्याचबरोबर त्यात फायबर ही आढळते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के हे भरपूर प्रमाण आढळतात त्याचबरोबर मॅग्नेशियम, फॉस्पोरस, पोटॅशियम, फोलेट,मैगणीज , सेलेनियम,झिंक यांसारखी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात त्याचबरोबर ओमेगा ६ फॅटी असिड ही यात पहिला जातो.
१. डाळिंबाचा अँटी प्लाक सारखे घटक पाहिले जातात यामुळे शरीराचे स्वास्थ्य निरोगी राहते. तंदुरुस्त राहते. दातामधील पायारिया आणि हिरड्या यांच्यातील आजार कमी करते.
२. डाळिंबाचे सेवन केल्याने त्यातील फायबर मुले पचनक्रिया सुधारते पोट साफ राहते. चेहऱ्याच्या समस्या दूर होतात चेहरा सतेज आणि डाग रहित होतो डाळिंब मध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि एंटी-ऑक्सीडेंट यांनी परिपूर्ण आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या समस्या दूर होतात.
३. उच्च रक्तदाब असणाऱ्या रोग्यांसाठी हा फळ अत्यंत फायदेशीर आहे यात असणारे व्हिटॅमिन सी आणि नाइट्रिक ऑक्साइड यामुळे रोग्याला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो.
४. डाळिंब हे लोह ने परिपूर्ण असे फळ आहे याचे सेवन केल्याने लाल रकपेशी वाढतात हिमोग्लोबिन वाढते आणि अंनेमिया सारख्या आजाराला आळा बसतो. रक्ताची कमतरता जाणवत नाही.
५. हृदयाच्या कार्यामध्ये नियमितता राहण्यासाठी ही डाळिंब गुणकारी आहे. रक्तवाहिन्यांचे पोषण करून रक्तप्रवाहात सुधारणा होते शिरा कडक होण्यापासून ही वाचवते.
६. नियमित रोज एक डाळिंब खाल्याने स्मरणशक्ती ही वाढते शिवाय विसरण्याचा आजार ही दूर होतो.
७. हाडांच्या सांध्यातील समस्या दूर होतात त्यामुळे होणारा त्रास, दुखणे कमी होते यासाठी एकतरी डाळिंब रोज खायला हवं.
८. डाळिंबाची साल उन्हात कडकडीत सुकवून ठेवावी.. लहान बालकाला जेव्हा जुलाब, हगवण लागते तेव्हा ही साल उगाळून द्यावी नक्कीच फरक पडतो शिवाय तीन टाइम ही साल उगाळून दिल्यास लहान बालकांमध्ये पोटातील जंत मरतात.