‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर, तुम्ही तोंड काळ करून कडी लाऊन घरात बसा’

‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर, तुम्ही तोंड काळ करून कडी लाऊन घरात बसा’

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्द केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मराठा समाजातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. निर्णयाविरुद्ध  समाजातील अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारला या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी लाइव्ह माध्यमातून संवाद साधला. आता मोदींनी आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षण प्रश्नात लक्ष घालावं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान या लाइव्हच्या माध्यमातून केलं आहे.

‘पंतप्रधान मोदींनी काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय,’ असं ठाकरेंनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला या संदर्भात पत्र लिहून मागणी करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून.’ असा थेट घणाघात भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *