इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरिकर यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं इंदोरिकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, आता महाराजांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ही याचिका अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दाखल केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे आपल्या विनोदी शैलीतील कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या काही वक्तव्याला अनेक संघटना, तसेच महिलांनी आक्षेप घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते.

स्त्री, पुरुष भेदभावाला प्रोत्साहन देणारं हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने संगमनेर न्यायालयात निवृत्ती महाराजांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला होता. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देऊन खटला रद्द ठरवला होता. पण, आता पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने महाराजांची मोठी अडचण झाली आहे.

 

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *