जुन्या घरात एक आत्मा…..असं म्हणतं विनोदी अभिनेता निखिल बनेने शेअर केला घराचा व्हिडिओ!

जुन्या घरात एक आत्मा…..असं म्हणतं विनोदी अभिनेता निखिल बनेने शेअर केला घराचा व्हिडिओ!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, आपलं घर ते आपलं असतं. वास्तूवर प्रेम केल्यास तिही आपल्यावर प्रेम करते आणि प्रसन्न राहते असे म्हणतात. मग ते घर हाय क्लास सोसायटीतलं असो नाही तर चाळीतलं प्रत्येकाला आपलं बालपणापासूनच घर खूप आवडतं. यातीलच एक बने. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला बने त्याच्या घरावर खूप प्रेम करतो.

त्यात चाळीतलं घर म्हटलं की, एक वेगळीच मज्जा असते. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी आपली नाळ जोडलेली असते. निखिल बने हा भांडुप शहरातील एका चाळीत राहतो. त्याचं बालपण याच ठिकाणी गेलं. अशात आता त्याने आपलं घर पुन्हा एकदा मोठं केलं आहे. घर छान बनवल्यानंतर त्याने घराचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

निखिल बने

यामध्ये त्याने बांधलेलं सुंदर आणि आलिशान असं घर खूप छान दिसत आहे. घरात हॉल नंतर वरती आणखीन एक खोली त्याने बनवली आहे. घरातूनच तिथे जाण्यासाठी जिना देखील बनवला आहे. व्हिडिओमध्ये त्याची आई देखील किचनमध्ये काम करताना दिसते आहे. निखिल बनेने घराचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की,

“जुन्या जागेत एक आत्मा असतो त्यामुळे ती जागा सोडण्यापेक्षा renovate करण्यात खरी मज्जा आहे.” त्याच्या या व्हिडिओवर आता लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. अनेक जण त्याच्या सुंदर घराचं कौतुक करत आहेत. चाहते त्याला खूप सुंदर, एक नंबर घर बनवलं अशा अनेक कमेंट करत आहेत.

निखिल बनेचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई भांडुप येथेच पूर्ण झाले. शाळेत असताना पासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती. सुरुवातीला बराच काळ तो बॅक स्टेजला काम करत होता. पुनरजन्म या नाटकातून त्याने पहिल्यांदा अभिनय केला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयातच करिअर करायचं असं ठरलं.

त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून त्याच्या करिअरला एक मोठी कलाटणी मिळाली. सध्या हा शो बंद आहे. काही कामानिमित्त आणि नावीन्य घेऊन येण्यासाठी तात्पुरता काही दिवस या शोने ब्रेक घेतला आहे. मात्र हा ब्रेक फक्त आणि फक्त शोमध्ये नावीन्य घेऊन येण्यासाठी घेतला गेला आहे. असे असले तरी अनेक चाहते आजही या शोचे जुने व्हिडिओ आवडीने वारंवार पाहताना दिसत आहेत.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *