koffee with Karan: करण जोहरच्या शोमध्ये कधीच दिसणार नाही रणबीर कपूर, हे आहे त्यामागचे कारण!

koffee with Karan: करण जोहरच्या शोमध्ये कधीच दिसणार नाही रणबीर कपूर, हे आहे त्यामागचे कारण!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, कॉफी विथ करण हा करण जोहर चा लोकप्रीय शो लवकरच सुरू होणार आहे. आणि हा शो सुरू होण्यापूर्वीच एक अशी बातमी समोर आली आहे की, हे जाणून रणबीर कपूरच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसू शकतो. करण जोहर त्याचा सुपरहिट शो ‘कॉफी विथ करण’ घेऊन पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे.

या शोच्या 7 व्या ‘सिझन ‘बद्दल चाहत्यांमध्ये देखील खूप उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की, या शोचे पहिले पाहूणे दुसरे तिसरे कोणी नसून बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे असणार आहेत. पण आता अस होणार नाही. कारण अलीकडेच करण जोहरने या विषयी खुलासा केला आहे.

करणं जोहर

रणबीरने शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. यासोबतच शो मध्ये न येण्याचे कारण देखील त्याच्या कडून सांगण्यात आले आहे. करण जोहर ‘कॉफी विथ करण’च्या 7 व्या सीझनसाठी टीव्हीवर परतण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत करण जोहरने रणबीर कपूरबद्दल एक अशी गोष्ट सांगितली, जी ऐकून नक्कीच चाहत्यांची मनं तुटू शकतात. अलीकडेच ‘फिल्म कम्पेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत करण

जोहरने त्याच्या शोबद्दल बोलताना रणबीर कपूर माझ्या शोमध्ये येणार नसल्याचे सांगितले. करण जोहर म्हणतो की, ‘आजकाल लोक खूप घाबरले आहेत. या वेगवान पिढीमध्ये, कोणतीही गोष्ट हेडलाइन बनू शकते आणि कोणतीही गोष्ट खळबळ माजवू शकते. यासोबतच पुढे बोलताना करण जोहर म्हणाला की, ‘रणबीर कपूर माझ्या शोमध्ये येणार नाही. येत्या काळात याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे त्याने मला सांगितले.

रणबीर मला म्हणाला, कृपया मला शोमध्ये बोलवू नको. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि यामुळेच मी शोमध्ये येण्याऐवजी तुझ्या घरी गप्पा मारायला आणि कॉफी घ्यायला येईन. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कलाकार मोकळेपणाने त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. त्यानंतर बराच गदारोळ होत असतो.

अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील रहस्ये देखील उघड होत असतात. तर अनेकांच्या चेहऱ्यावरून पडदा पडतो. सध्या हा शो 7 जुलैपासून सुरू होणार आहे. तर अशा परिस्थितीत आता पहावे लागेल की करण जोहरच्या पाहुण्यांच्या यादीत पहिला पाहुणा कोण असेल.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *