‘सख्ख्या मामाने नकार दिला, कोरोनाग्रस्त आईच्या लेकरांचे राष्ट्रवादीचे आ. लंके झाले मामा’

‘सख्ख्या मामाने नकार दिला, कोरोनाग्रस्त आईच्या लेकरांचे राष्ट्रवादीचे आ. लंके झाले मामा’

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे कायमच चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. अशीच एक कौतुकास्पद कामगिरी निलेश लंके यांनी केली आहे.

आ. निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरमध्ये एका कुटुंबातील कोरोनाबाधित आई-वडील उपचार घेत आहेत. मात्र, कोरोना बाधित असल्याचं समजल्यानंतर आपल्या लेकरांना कोण सांभाळणार असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

सदरील माऊलीने सख्ख्या भावाकडे आपल्या लेकरांना सांभाळण्याची विनंती केली. मात्र, स्वतःच्या भावाने त्या लेकरांची जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला. त्यामुळे आपल्या लेकरांचा सांभाळ कोण करणार अशी चिंता त्या दाम्पत्याला पडली.

या असह्य आईच्या मदतीला आमदार निलेश लंके धावून आले आहेत. लंके यांनी त्या लेकरांची मामा म्हणून स्वतः जबाबदारी स्वीकारली. यामुळे आता आई-वडील निर्धास्तपणे कोरोनाशी सामना करत आहेत. तुमच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्या ठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून या दोन्ही भावा-बहिणींची गेल्या आठ दिवसांपासून ते सांभाळ करत आहे. कुटुंबातील सदस्य या नात्याने काळजी घेतली जात आहे. याबाबत निलेश लंकेनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *