‘आनंद पोटात मावेना’ अभिनेता स्वप्नील जोशीचा राघव असं काही म्हटला की, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

‘आनंद पोटात मावेना’ अभिनेता स्वप्नील जोशीचा राघव असं काही म्हटला की, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपलं बाळ हे हुशार आणि आपल्या पेक्षा थोड चतुर असावं असं वाटतं असतं या साठी सर्वच पालक आपल्या बाळाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. त्यांच्यावर संस्कार करत असतात. अशात जेव्हा आपलं मुलं सुरुवातीला काहीतरी बोलू लागतं तेव्हा प्रत्येकच आई वडिलांना आपल्या बाळाचं विशेष कौतुक वाटतं. तर आता असच काहीस स्वप्नील जोशीच्या आयुष्यात देखील घडत आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतो. तसेच त्याच्या दोन्ही मुलांबरोबर तो नेहमी मस्ती करताना देखील दिसतो. स्वप्नीलला दोन मुलं आहेत. मायरा आणि राघव अशी त्याच्या दोन्ही मुलांची नावं आहेत. हे दोघेही आपल्या बाबांबरोबर सतत काही ना काही धुमाकूळ घालत असतात. अशात स्वप्नील देखील त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतो.

स्वप्नील जोशी

सध्या त्याचा आणि मुलगा राघवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये राघव पहिल्यांदा एक कठीण शब्द बोलायला शिकला आहे. त्याच्या या कठीण शब्दाचा व्हिडिओ स्वप्नीलने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वप्नील आपल्या मुलाला विचारतो आहे की,

राघव तु पहिल्यांदा दुकानात नवीन बुट पाहिले होते तेव्हा तू काय झाला होतास? यावर राघव त्याच्या बोबड्या बोलांनी म्हणतो की, आश्चर्यचकीत. पुढे स्वप्नील त्याला पुन्हा काय काय म्हणत परत एकदा तेच विचारतो तेव्हा तो पुन्हा एकदा आश्चर्यचकीत असं म्हणतो. आता राघव तसा फार लहान आहे पण त्याने एवढा कठीण शब्द अगदी स्पष्टपणे उच्चारला आहे.

त्यामुळे स्वप्नील खूप आनंदी झाला आणि व्हिडिओमध्ये तो खळखळून हसताना दिसत आहे. आपल्या मुलाने पहिल्यांदा एवढा कठीण शब्द स्पष्ट उच्चारल्याने त्याला खूप आनंद झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर आता पुन्हा एकदा लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसतो आहे. अशात एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की,

“अरे राघव तर छोटा स्वप्निल आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, “याचे बोबडे बोल ऐकून आता आम्हीही आश्चर्यचकित झालो.” स्वप्नील सध्या त्याच्या तू तेव्हा तशी या मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या मालिकेचे देखील अनेक व्हिडिओ तो त्याच्या स्टोरीमध्ये शेअर करत असतो.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *