“मेरा यार हसं रहा है बारिश की जये”, वर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या मायराने लगावले जबरदस्त ठुमके!

“मेरा यार हसं रहा है बारिश की जये”, वर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या मायराने लगावले जबरदस्त ठुमके!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, काल राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या पावसाने सडकून हजेरी लावली. यावेळी अनेकांनी मनिसोक्त पावसाचा आनंद घेतला. तशी पहिल्या पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी असते. त्यामुळे ही मज्जा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीने देखील घेतला आहे. परीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे पावसात भिजतानाचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

काल शुटींग संपवून परी म्हणजेच मायरा तिच्या गाडीतून घरी येत होती तेव्हाच रात्री 8 च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सर्वच जण जसे पावसात भिजत होते तशीच मायरा देखील भिजली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाऊस सुरू झाल्यावर ती आपल्या गाडीतून बाहेर पडणारे पावसाचे थेंब पाहताना दिसत आहे.

मायरा

तसेच आणखीन एका व्हिडिओमध्ये ती एका हिंदी गाण्यावर नाचताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये मागे “मेरा यार हसं रहा है बारिश की जाये” हे गाणं वाजत आहे. आणि यावर मायराचा स्पेशल डान्स पाहायला मिळत आहे. परी म्हणजेच मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे अनेक जण पुन्हा एकदा तिचं कौतुक करत आहेत.

अनेकांनी तिला कमेंट करत हार्ट ईमोजी पाठवले आहेत. तसेच एका चाहत्याने तिला कमेंटमध्ये म्हटलं आहे ” किती गोड आहेस ग तू… किती छान एक्स्प्रेशन देतेस… पुण्याला घेऊन या ना एकदा तिला श्वेता मॅडम” असं म्हटलं आहे. तर आणखीन एका चाहत्याने लिहिले आहे की, “मायरा इज अ रॉक”, तर आणखीन एकाने कमेंटमध्ये तिची काळजी व्यक्त केली आहे

आणि लिहिलं आहे की, “परी जास्त वेळ पावसात नको भिजू नाहीतर ताप येईल” सध्या मायरा नेहा आणि यशच्या लग्नात फुल टू एन्जॉय करत आहे. त्यांच्या लग्नाचा हा विशेष भाग रविवारी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये देखील परीचा दिलखुलास डान्स आपल्याला पाहायला मिळेल.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *