निलेश लंकेंचा चक्क कोविड सेंटरमध्ये मुक्काम, ‘हे’ आहे व्हायरल फोटोमागील सत्य

निलेश लंकेंचा चक्क कोविड सेंटरमध्ये मुक्काम, ‘हे’ आहे व्हायरल फोटोमागील सत्य

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे कायमच चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. कायम जनतेच्या सेवेत असलेला लोकप्रतिनिधी म्हणून निलेश लंकेंचा नावलौकिक महाराष्ट्रात आहे.

आ. निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. यावेळी स्वतः आमदार निलेश लंके हे रुग्णांची काळजी घेतात. रुग्णांचे टेंपरेचर, रुग्णांचे ऑक्सीजण चेक करतात. तसेच प्रत्येक रुग्णांची सेवा करण्यास ते आपल्या कोविड सेंटरमध्ये तत्पर असतात.

सध्या निलेश लंके यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. नेमकं या फोटोमागचं सत्य आहे तरी काय ? शरद पवार कोविड सेंटर आरोग्य मंदिर याठिकाणी आमदार निलेश लंके हे जमिनीवर झोपले असल्याचा हा फोटो आहे. साधेपणाने २४ तास रुग्णांची सेवा कारणाने निलेश लंके संध्याकाळी सेंटरमधील कार्यकर्त्यांसह जमिनीवरच अंथरूण करून झोपले आहेत.

सदरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेले निलेश लंके यांचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आम्हालाही असा लोकप्रतिनिधी मिळावा अशा प्रतिक्रिया सोशल मिडियामध्ये पाहायला मिळत आहेत.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *