‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती, पण पश्चाताप होत नाही’; फडणवीसांच मोठं विधान

‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती, पण पश्चाताप होत नाही’; फडणवीसांच मोठं विधान
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे केलेलं सत्तास्थापन चूकच होतं असा निर्वाळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते लोकसत्ता वृत्तपत्राच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे सरकार स्थापन करण्यावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. असे फडणवीस म्हणाले.

ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खूपसला जातो. त्यावेळी राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. आपल्या पाठित खंजीर खूपसला गेला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे या भावनेतून हा निर्णय झाल्याचं ते म्हणाले.

 

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *