करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत आमिर खान आणि किरण राव यांना असे पाहून लोक संतापले, म्हणाले तुम्हाला काही कळतं का?

मित्रांनो, प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरने काल म्हणजेच 25 मे रोजी आपला 50 वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. करणने त्याच्या वाढदिवसानिमित्त ग्रॅण्ड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतच्या जवळपास प्रत्येक स्टारने हजेरी लावली. करणच्या या खास दिवशी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान त्याची माजी पत्नी किरण रावसोबत पोहोचला.
यावेळी आमिर आणि किरणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पार्टीत दोघेही खूप आनंदी दिसत होते. त्याचवेळी आमिर आणि किरण देखील पापाराझींसमोर जोडप्यासारखे पोज देताना दिसले. पण या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक त्यांना फार ट्रॉल करताना दिसत आहेत.
करण जोहरच्या पार्टीतील आमिर खान आणि किरण राव यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते चांगलेच संतापले आहेत. यावर कमेंट करून यूजर्स दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करत लिहिले की,
‘पहिले हे लोक लग्नाची चेष्टा करतात आणि आता घटस्फोटाचीही चेष्टा करत आहेत.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, ‘त्यांनी घटस्फोट घेतला, नाही का?’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘हे लोक घटस्फोट का घेतात जेव्हा त्यांना एकत्र फिरावे लागते आणि जोडप्यासारखे पोज द्यावे लागतात?’ त्याचबरोबर किरणच्या हेअरस्टाइलवरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
करिना कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, जान्हवी कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. त्याचवेळी पार्टीतील प्रत्येकाने आपल्या ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.