मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय, मोदींना पत्र लिहिणार

मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय, मोदींना पत्र लिहिणार

आज सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चित मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मराठा समाजाचा आक्रोश पुन्हा पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळतोय.

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता मराठा आरक्षण प्रश्नांत सहभाग घेतला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महत्वाचा उपाय आठवले यांनी सांगितला आहे. राज्य शासनाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याचं आठवले म्हणाले. मात्र, न्यायलायाच्या निर्णयाचे स्वागत करतो असही त्यांनी म्हटलं आहे.

देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे, अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12 टक्के आरक्षण द्यावे अशी माझी मागणी असून त्याबाबतचे विनंती पत्र आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहोत. क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे आरक्षण दिल्यास मराठा समाजाला त्यातून आरक्षण मिळेल, असा उपाय आठवले यांनी सांगितला.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचं आठवले म्हणाले. क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *