समीर चौगुले आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र..!

समीर चौगुले आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, दिवसेंदिवस लागोपाठ एका पेक्षा एक नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री निमिषा संजयन ही ‘हवाहवाई ‘ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर हास्यजत्रेतील काही कलाकार मंडळी देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन किचन ‘ हा सिनेमा मल्याळम मध्ये बहुचर्चित ठरलेला सिनेमा असून या चित्रपटांमधील अभिनेत्री निमिषा

संजयन ही पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत आहे. नुकतेच ‘हवाहवाई’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाला आहे. तिच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘हवाहवाई’ असून या चित्रपटामध्ये हास्य जत्रेमधील समीर चौगुले आणि गौरव मोरे हे दोघे कमालीचे कलाकार झळकणार आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ जाधव, वर्षा उसगावकर, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, सीमा घोगळे, पूजा नायक, बिपिन सुर्वे, किशोरी गोडबोले, संजीवनी जाधव,

अतुल तोडणकर यांसारख्या कलाकार मंडळींनी विविध पात्रे साकारली आहेत. पोस्टर लॉन्च झाल्याबरोबर प्रेक्षकांनी हवाहवाईच्या या पोस्टरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सगळेच प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवसह हास्यजत्रेमधील कलाकार मंडळी एकत्र काम करणार आहेत. सिद्धार्थ जाधव आणि समीर चौघुले यांचा हा पहिला पहिला एकत्रित काम करणारा चित्रपट ठरणार आहे.

हवाहवाई या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश टिळेकर यांनी केल आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीला उत्तमोत्तम कौटुंबिक सिनेमे दिले आहेत. या चित्रपटाचे लेखन देखील महेश टिळेकर यांनीच केलं आहे. अशातच या चित्रपटाची निर्मिती नाईंटीन नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे यांनी केली आहे. कौतुकाची बाब म्हणजे या चित्रपटाचा गायण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी केलं आहे

आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायिका उर्मिला धनगर यांच्या सुरेनमय आवाजात देखील एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं गेलं आहे. या चित्रपटातील सगळी गाणी महेश टिळेकर यांनी लिहिली असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांनी केला आहे. त्याचबरोबर संदेश सँडी यांनी चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन पाहिले आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *