पवार मैदानात, लसीकरणाला गती देण्यासाठी शरद पवार ‘सिरम’सोबत स्वतः बोलणार

पवार मैदानात, लसीकरणाला गती देण्यासाठी शरद पवार ‘सिरम’सोबत स्वतः बोलणार
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

जागतिक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणत लसीकरण सुरू आहे. मात्र, लासिकरणासाठी लागणाऱ्या लसींचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या राजकीय वाटचालीच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा बैठक घेत असतात. काल राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पवार यांनी पक्षातील मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची आढावा बैठक बोलावली होती, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील अनेक जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोना आणि म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावरील उपाययोजनांची माहिती घेतली.

तसेच राज्यातील लसीकरण मोहीमेचा आढावा घेऊन लसीकरणाला गती देण्यासाठी शरद पवार हे स्वत: सिरम इन्स्टिट्यूटशी बोलणार असल्याचे, नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

 

 

 

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *