राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपवर आरोप

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपवर आरोप

साताऱ्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तींनी सदरील पक्ष कार्यालयावर दगडफेक केली आणि तेथून फरार झाले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या दगडफेकीचा निषेध केला आहे.

भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचं आरोपही आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय. महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत आहेत. हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सातारा पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरु केली आहे.

अज्ञात काही व्यक्तींनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राज्यमंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली. ही नावं पोलिसांना कळालेली आहेत. त्या व्यक्ती कोणत्या पक्षाचं काम करतात, कोणत्या संघाचं काम करतात, कोणत्या आमदाराचं काम करतात हे सुद्धा कळलेलं आहे. असही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी आरोपींना 24 तासात अटक करावी, ही विनंती आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. खालच्या पातळीवर राजकारण केलं जातेय हे दुर्दैव आहे. असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *