जेंव्हा ट्रक ड्राइवर म्हणतो ‘साहेब मला पाणी’ द्या !

जेंव्हा ट्रक ड्राइवर म्हणतो ‘साहेब मला पाणी’ द्या !
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन घडणाऱ्या अनेक गोष्टीही समोर येत आहेत. संचारबंदीदरम्यान एका ट्रक चालकाच्या जेवणाची सोय करुन त्याला बीड ग्रामीण पोलिसांनी पैसेही दिले. घडला प्रकार असा, की जीवनावश्यक वस्तू असलेला एक ट्रक गुजरातहून सोलापूरकडे जात होता. चालक धीरज पटेल ट्रक घेऊन निघाला होता. परंतु, दोन दिवसांपूर्वी डिझेल संपल्याने धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाट्याजवळ हा ट्रक बंद पडला.

पंप बंद आणि चालकाजवळ पैसेही नव्हते. मात्र, मांजरसुंबा येथील एका ढाब्यावर पैशांची सोय होती. मात्र, मांजरसुंब्याचे अंतरही तेथून साधारण २५ किलोमिटर होते. काय करावे अशा प्रश्नांनी धीरज पटेलला घेरले होते. एक तर वाहतूक बंद आणि खिशात दमडीही नाही. अशात चालत धीरज पटेल मांजरसुंब्याकडे निघाला. तेवढ्यात ग्रामीण पोलिसांना रस्त्याच्या कडेला उभा ट्रक दिसला. पोलिसांनी ट्रकमधील कागदपत्रावरील मोबाईवर मालकाला फोन केल्यानंतर त्याने दुसऱ्या एका ट्रकच्या चालकाला पाठवून ट्रक हलविला. परंतु, ट्रकचा मुळ चालक मात्र मध्येच अडकून पडला.

भुक आणि तहानेने व्याकूळ होऊन झोपलाबुधवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत बडे यांनी या चालकाला शोधण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या. नामलगाव फाट्यावरुन बीड ग्रामीण पोलिस मांजरसुंबा रस्त्याने शोधत निघाले असता खजाना विहीर परिसरात हा चालक भुक आणि तहानेने व्याकूळ होऊन झोपला होता. फौजदार पवन राजपुत यांनी त्याला उठवताच ‘साहेब पाणी द्या’ असे धीरज पटेल म्हणाला.

पाणी देऊन त्याला शुद्धीवर आणल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जेवणाचीही सोय केली. याच रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या एका मालवाहू ट्रकमध्ये त्याला बसवून त्याच्या हातावर पैसेही घातले. पवन राजपूत, तानाजी डोईफोडे, अनिल घटमळ यांच्या या माणूसकीच्या दर्शनाचे कौतुक होत आहे. दरम्यान, संचारबंदीत कोणाला अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी वाहन मिळाले नाही, तर पोलिसांची गाडी उपलब्ध करुन देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी करुन माणूसकी दाखवून दिली आहे.

admin

admin