बहुचर्चेत ‘भिरकिट’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित, ही तुफान विनोदीचा जोडी दिसणार महत्वाच्या भूमिकेत!

बहुचर्चेत ‘भिरकिट’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित, ही तुफान विनोदीचा जोडी दिसणार महत्वाच्या भूमिकेत!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक विनोदी कलाकार आहेत ज्यांच्या नुसत्या नावाने चित्रपट पाहण्यासाठी तिकीट बारिवर गर्दी उफाळून येत असते. त्यातीलच दोन पट्टीचे विनोद वीर म्हणजे कुशल बद्रिके आणि सागर करंडे. या दोघांच्या जोडीने चला हवा येऊ द्याचा मंच चांगलाच गाजवला आहे. अशात आता ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

चित्रपटाच नाव आहे भिरकिट. हा एक घसघशीत विनोदाने भरलेला चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये गावात असलेली प्रेम कहाणी आणि लफडी पाहायला मिळणार आहेत. तसेच ट्रेलरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू दाखवला आहे. तात्या नावाचा एक माणूस गावातील खूप मोठा व्यक्ती असतो.

भिरकीट

त्याच्या निधनाने सर्व जण त्याच्या अंत्य दर्शनासाठी येत असतात. हे अंत्यदर्शन ट्रेलरमध्ये तुफान विनोदी दिसत आहे. खरोखर आजवर मराठी सिनेसृष्टीत एवढं विनोदी अंत्य दर्शन कुणाचं झालं नसेल. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, हृषीकेश जोशी, याकुब सय्यद, तानाजी गलगुंडे, मोनालिसा बागल

आणि उषा नाईक हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच अशोक जगदाळे यांनी दिगदर्शित केलेल्या या चित्रपटात श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, सागर कारंडे, रोहित वसंतराव चव्हाण आणि आर्या घाग हे कलाकार देखील झळकणार आहेत. अभिनेत्री राधा कुलकर्णी देखील या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारताना दिसेल

सध्या तिचा या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असताना दिसतो आहे. यामध्ये ती तत्त्यांच्या अंत्य दर्शनाला येते. मात्र ती रडत असताना तिचा पदर सारखा खाली सरकताना दाखवल आहे. यामुळे काही जण तिला या भूमिकेसाठी ट्रोल देखील करत आहेत. राधाने या आधी देखील

काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेत देखील ती दिसली होती. अशात आता भिरकिट या चित्रपटात देखील तिचा अभिनय पाहायला मिळेल. हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 जून रोजी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *