पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे 3 घरगुती उपाय करा, लठ्ठपणा काही दिवसातच कमी होईल !

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे 3 घरगुती उपाय करा, लठ्ठपणा काही दिवसातच कमी होईल !

पोटा वरील चरबी कमी करणे ही बर्‍याच व्यक्तींसाठी एक कठीण काम बनलेले आहे. बहुतेक वेळा आपण चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या मानसिकतेने या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेषकरून तरूण पिढीसाठी खुप मोठया प्रमाणात या त्रासाला सामोरे जात असतांनाचे चित्र आहे.

अवेळी जेवण व अपुरी झोप महत्वाचे म्हणजे व्यायाम करत नसल्याने आपल्या शरीराचा आकार खास करून आपले पोट वाढल्याचे दिसते. शरीरात जास्त चरबी असलयाने त्याचा भार आपल्या पोटावर पडतो. परिणामी आपल्याला पोटांच्या व्याधी वाढतांत .

वाढलेले पोट ही आजच्या तरुणाईची समस्या आहे. त्यासाठी अनेकजण जीम लावतात, व्यायाम करतात, महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही. किंवा त्यात सातत्य राखणे अनेकांना जमत नाही. पण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल.

पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.

दालचिनी डायबिटीज कमी करण्यास फायदेशीर असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र आम्ही तुम्हाला सांगतोय की दालचिनीचा वापर तुम्ही वजन कमी करण्यातही करू शकता. जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारू शकता. यासाठी तुम्हाला मधाची गरज पडेल. जर दालचिनी आणि मध एकत्रित मिसळून घेतल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

थोडं जिरे घ्या आणि पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा आणि नंतर ते पाणी वापर. जास्त काळ पाण्यात राहिल्यास जिऱ्यातील असलेले पोषक घटक पाण्यात विरघळतात आणि पाण्याचा रंग पिवळसर होतो. जिरे पाणी बनवण्यासाठी तुम्ही रात्री झोपायच्या आधी एका ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे जिरे घाला आणि रात्रभर सोडा. जिरं लठ्ठपणा कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *