उशा ताईंचा आवाज ऐकताच तो लागला चळाचळा कापू, लुबाडले होती मोठी रक्कम..!

उशा ताईंचा आवाज ऐकताच तो लागला चळाचळा कापू, लुबाडले होती मोठी रक्कम..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीसह हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी एका शोच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला आहे. त्यांनी त्यांच्या कामाचे पैसे कशा पद्धतीने वसुली केले हे त्या सांगत आहेत. उषा नाडकर्णी यांनी आतापर्यंत मराठी सह हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत खूप गाजलेले सिनेमे महाराष्ट्राला दिले आहेत.

उषा नाडकर्णी यांनी अगडबम, देऊळ, सिंहासन, वास्तव, रुस्तम, व्हेंटिलेटर, माहेरची साडी, यशवंत, माहेरची साडी  यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. उषा नाडकर्णी यांना बरेचजण  ‘आऊ’ या नावाने संबोधित करतात. उषा नाडकर्णी यांनी 1979 मध्ये स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांना आत्तापर्यंत ‘झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री’ हा पुरस्कार भेटला आहे. उषा नाडकर्णी यांची सर्वात पहिली मालिका ‘रिश्ते’ ही होती.

त्यानंतर पवित्र रिश्ता मध्ये देखील उषा नाडकर्णी यांनी स्वतःच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अशा पद्धतीचे अनेक मालिकांमध्ये उषा नाडकर्णी झळकल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत. एका शोच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारला गेला की, “तुम्ही बँकेमध्ये जॉब करत होत्या मग एखाद्या निर्मात्याने तुम्हाला तुमचे पैसे दिले नसतील, तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने वसूल केले असतील ना. “असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यानंतर उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खुलासा दिला.

त्या म्हणाल्या की, “तुम्हाला एक सांगते माझे असे पैसे कितींदा किती ठिकाणी राहिले तर मी सांगते माझे राहिलेले पैसे मला जो कोणी गोळा करून देईल त्याला मी माझ्या पैशांमधला 10%, 20%  देऊन टाकते. कारण जितके चांगले लोक आहेत पैसे देण्यात तितकेच पैसे चोरण्यात लबाड लोक आहेत मी एक सिरीयल दहाएक एपिसोड करून सोडली ते सगळं एकंदर बघितल्यावर कळल याचं काही खरं नाही मी ही सिरीयल सोडते असं मी त्यांना सांगितलं.

मी सिरीयल सोडली पण मला एक पैसा मिळाला नव्हता. तुम्ही मला सांगा मी चूक की बरोबर कितींदा फोन केला पैशांसाठी पण पैसे काही दिले नाहीत रोज सांगायचे की मॅनेजर नाही आहेत मग एक दिवस असं झालं की मॅनेजरनेच फोन उचलला मग मी म्हणलं मेरा पैसा देने वाले हो या नही वरणा मे वाईन के दुकान के ऊपर आके  आपकी खोलूगी.” असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *