‘गुणरत्न सदावर्ते यांच्याशी भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज’

‘गुणरत्न सदावर्ते यांच्याशी भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज’
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवले. आणि मराठा समाजातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुनरत्न सदावर्तेला भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो. असा सवाल करत. भाजपशी त्यांचे संबंध आहेत का ? असा सवालच त्यांनी विचारला आहे.

हसन मुश्रीफ हे शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठा विरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

 

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *