अनेक रोगांवर रामबाण उपाय हवाय? हिवाळ्यात अवश्य खा मुळा वाचा कारणे

0

आपल्या जिभेला जी चव चांगली वाटते तोच पदार्थ किंवा भाज्या आपण रोज रोज खातो. ह्याला जिभेचे चोचले पुरवणे असं म्हणायला काय हरकत आहे? म्हणजेच काही भाज्या अशा आहेत की ज्या आपल्याला आवडत नाही म्हणून आपण त्या घरीच आणू देत नाही. म्हणजे घरातली मोठी मंडळी ज्या स्वतःला आवडतात त्याच भाज्या आणतात आणि त्याच आलटून पालटून खाल्ल्या जातात. काही लोक तर बटाट्याची भाजी जर जेवणात नसेल तर जेवताना तोंड वाकडं करतात. कसं तरी गिळतात. ही भाजी मला आवडत नाही , ती करू नको असा दम दिला जातो घरात जेवण बनवणाऱ्या बाईला, बायकोला, आईला, किंवा ताईला. त्यामुळे घरातल्या छोट्यांना सुद्धा त्याच भाज्या खाव्या लागतात. आणि दुसऱ्या भाज्या ही असतात त्या छोट्या मंडळींना माहितीच नसतं.

काही भाज्या ठराविक ऋतूत येतात. पण त्या भाज्या सगळेच खातात असं नाही. भाज्यांमध्ये काय गुण असतात त्याचा विचारच आपण करत नाही. शाकाहारी जेवणात पालेभाज्या खाण्याला खूप महत्व दिले आहे. पण त्या कोणकोणत्या ऋतूत येतात आणि त्या नेहमी खाल्ल्या तर त्याचा काय फायदा आपल्या शरीराला होतो हे माहिती असून सुद्धा काही लोक त्या भाज्या त्यांना आवडत नाहीत म्हणून बनवतही नाहीत आणि खात सुद्धा नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या आपल्या शरीराला काय फायदा देतात ते कळतंच नाही. नंतर काहीतरी वेगवेगळे त्रास शरीराला व्हायला लागतात तेंव्हा डोळे उघडतात आणि डॉक्टरकडे धाव घेतात. शरीराला पोषक जीवनसत्वे न मिळाल्यामुळे होतात वेगवेगळे आजार.

आपण काही लहान मुलं पाहतो , जन्मतः च खूप जाडजूड असतात, म्हणजे प्रमाणापेक्षा जाड असतात. तर काही कुपोषित असतात. हे फक्त आहारावर अवलंबून असते हे समजून घेतले तर त्रास होणार नाहीत. आता पालेभाज्या आपल्या जेवणात रोज असल्या तरी आजार आपल्या जवळ सुद्धा फिरकणार नाही. ह्या भाज्यातल्या काही भाज्या तर झालेले आजार पळवून लावतात. पण रोज खाल्ल्या तर. आता एक भाजी तर अशी आहे की ती जर नेहमी आहारात असेल तर काय काय फायदे देते ते बघा.

“मुळ्याची भाजी” , म्हणजे एक गुणकारी भाजी. अनेक आजार बरे करते , आणि आजार होऊ न देण्याची पण ताकत ह्या भाजीत आहे. पण सगळे लोक नाही खात ही भाजी नेहमी. कारण आवडत नाही. काय फायदे आहेत ते जरा बघाच ही भाजी नेहमी खाण्याचे.
*- कफदोष दार करते ही भाजी: सायनस चा त्रास होणाऱ्यांनी ही जर भाजी नेहमी खाल्ली तर हा त्रास हळूहळू कमी होत जाऊन नाहीस होतो.
*- सर्दी, पडसे, आणि खोकला ह्या नेहमी नेहमी होणाऱ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे मुळ्याची भाजी आहारात ठेवणे.
*- शरीरात वाढणारी साखर नियंत्रित ठेवते बरं का ही भाजी. नुसत्या मुळ्याचे २/३तुकडे सॅलड स्वरूपात खाल्ल्यास डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येते . हा मोठा फायदा होतो.
*- मुळ्याच्या नुसत्या पाल्याची भाजी परतून खाल्यास पचन शक्ती वाढते, दृष्टी सुधारण्याला मदत होते. आणि रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.’क’ जीवनसत्व मिळते.
ह्या मुळ्याच्या भाजीचा प्रत्येक भाग हा गुणकारी आहे. मूळ्याचा पाला हिरवी पाले भाजी म्हणून, मुळा सॅलेड किंवा भाजी म्हणून, आणि त्याचं बी औषधी म्हणून गुणकारी ठरतो. अशा ह्या मुळ्याच्या भाजीचे नियमित सेवन म्हणजे शरीर स्वास्थ्याची गुरुकिल्ली. घरातल्या प्रत्येकाने खाल्ली पाहिजे म्हणजे आजार राहतील उंबरठ्या बाहेर.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!