आतापर्यंत कधीही न पाहिलेले सात साधू आलेत या कुंभमेळयात !

0

हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजे कुंभ मेळा. आता तर प्रयागराजमध्ये (जुन्या अलाहबादमध्ये) आता श्रद्धाळू लोकांचा तर जणू पूरच आला आहे. प्रत्येक वेळी जरी तुम्ही मेळ्यात गेले तरी तुम्हाला चित्र-विचित्र साधू तिथे दिसतील जे आकर्षणाचे भले मोठे केंद्र आहे. आज मी तुम्हा कुंभ मेळ्यात दिसणाऱ्या काही साधूबद्दल सांगणार आहे जे आकर्षणाचे एक केंद्र असते.

१) खडेश्वरी बाबा : आता नावातच सगळं काही आहे असं म्हणता येईल. या बाबांनी प्रण केला आहे कि जो पर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिर बनणार नाही तो पर्यंत ते उभेच राहणार. मागच्या चार वर्षांपासून ते बसलेही नाहीत आणि लोटलेही नाहीत.

२) रुद्राक्षवाले बाबा : या बाबांनी ११ हजार रुद्राक्षांची माळ धारण केलेली असते. आश्चर्याची गोष्ट तर हीच आहे कि या बाबांनी एकही रुद्राक्ष स्वतः विकत घेतला नाही. काही दिवसांपूर्वी नेपाळ नरेशने सुद्धा या बाबाला सोळा मुखी रुद्राक्ष भेट म्हणून दिला आहे.

३) गोल्डन बाबा : सोन्याच्या दागिन्यांनी नटलेले हे बाबा कुंभ मेळ्याचे सर्वात मोठे आकर्षण. यावेळी यांच्या दागिन्यांपेक्षा यांच्या कोठडीची चर्चा जास्त होती. त्यांनी एका पोलीसवाल्याला धमकी दिली होती.

४) राधे बाबा : जुना आखाड्याचे हे राधे बाबा गेल्या नऊ वर्षांपासून आपला एक हात उंच करून आहेत. यांनी हा प्रण जागतिक शांतीसाठी आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी केला आहे.

५) पेट्रोल बाबा : हा नागा बाबा सावन गिरी, गुजरात म्हणून युपीला येतो आणि तेही एसयुव्हीमध्ये बसून. म्हणून हे बाबा दक्षिणेत पेट्रोल मागत आहेत.

६) टोपीवाले बाबा : या बाबांना पाहून तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. त्यांनी आपल्या डोक्यावर चंद्र आणि टोपी धारण केली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकं सेल्फी घेण्यासाठी येत आहेत.

७) जटाधारी बाबा : कुंभमेळ्यात आलेल्या विभिन्न बाबांपैकी हेही एक. हे बाबा खूपच तंत्रज्ञानाशी मित्रत्व जपणारे आहेत. बाबांकडे Laptop आणि स्मार्टफोनसुद्धा आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!