उसाच्या रसाचे “हे” फायदे तुम्हाला माहिती आहे का?

0

उन्हाळा म्हटला कि जेवढं लोक उन्हामुळे नाक मुरडतात तितक्याच आवडीने थंड पेय आणि आईसक्रीम-कुल्फी खायला मिळणार या गोष्टींनी सुखावतात. बर्फाचे गोळे आणि उसाचा रस विकणारे आपल्याला आपल्या मोहल्ल्यात आणि गल्लीत पाहायला मिळतात. उसासोबतच आता अनेक फळांचा रस विकणारेही तेवढ्याच संखेत दिसतात पण आपल्याला माहिती आहे; जे उसाच्या रसात आहे ते दुसऱ्या कोणत्याच फळात नाही. उन्हाळा आला कि आपणास जागोजागी उसाच्या रसाची गुऱ्हाळे पाहायला मिळतात. आजकल लोक अनेक प्रकारच्या फळांचे रस पितात. प्रत्येक रसाचे आपले वेगवेगळे फायदे असतात. आज मी तुम्हाला उसाच्या रसाने होण्याऱ्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहे, चला तर जाणून घेऊया.

 

उसाच्या या रसाने शरीराला बरेच फायदे होतात त्या पैकी एक आहे पोषक तत्वांची भर. उसाच्या रसात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. एका चांगल्या दर्जाच्या विश्वविद्यालयाने आपल्या अभ्यासात नमूद केलं आहे आहे कि उसाच्या रसात असे काही पोषक मूल्य आहेत ज्याने कैंसर सारख्या घातक रोगांचा धोका टळतो. उसाचा रस कैंसरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. पौष्टिक पेय म्हणून तुम्ही उसाचा रस पिऊ शकता पण ह्याची काळजी घ्या कि तुम्ही उसाचा रस हा योग्य प्रमाणात पीत आहात.

पोटाशी संबंधित काही आजार असतील तर उसाचा रस आपल्याला त्यातून आभर पडण्यास मदत करतो. यामुळे पोट साफ होते व बद्धकोषतेसारखे अनेक विकार बरे होतात. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनासुद्धा उसाचा रस प्यायला पाहिजे.  शरीरातील पित्त याने दूर होते.

उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित काही रोज असतील तर त्यांपासून मुक्तता होते आणि त्यातून आपण स्वतःला वाचवू शकतो. उसाचा रस प्यायल्याने हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते. हा रस नियमित प्यायल्याने मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते ज्यामुळे आपले शरीर हे नेहमी निरोगी राहण्यास मदत होते. शरीरातील धमन्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्यातील जो काही मळ असेल तो बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते. त्यामुळे आपला रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत सुरु असतो.

उसाचा रस थंड असतो म्हणून त्याने शरीराला सुद्धा थंडी मिळते आणि शरीराची उष्णता कमी होते. शरीरात द्रव्याचे प्रमाण वाढते. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस नक्की प्या. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. लहान मुलांसाठी तर हे एकदम उत्तम पेय आहे. उन्हाळा आला कि आपल्या मुलांना उसाचा रस नक्की पाजा.

जर हा लेख तुम्हाला माहिती देणारा आणि उसाच्या रसाचे पुरेपुरे फायदे सांगणारा वाटला असेल तर आपल्या परिवाराशी, दोस्त-मित्रांशी, सहकाऱ्यांशी नक्की शेयर करा. त्यानांही उसाचे महत्त्व कळू द्या आणि निरोगी आयुष्य जगायला मदत करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!