एका माजी सैनिकाचा मुलावर स्टॅम्प पेपर वर लिहून देण्याची वेळ आली.वाचा आणि अभिमानाने शेअर करा.

0

मित्रांनो नमस्कार !!
मी चांगदेव गिते (M. pharma)
रा. गितेवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील एक सर्वसामान्य युवक आहे.
माझे वडील एक सामान्य माजी सैनिक आहेत (त्यांनी अनेक कठोर प्रसंगात प्राणाची बाजी लावुन तब्बल 22 वर्षे देशाची सेवा केली आहे) सध्या ते शेती पाहुन एक खाजगी जीप चालवतात व आई गृहिणी असुन शेती ही करते.

● मित्रांनो वडील माजी सैनिक असल्याने आपसूकच देशभक्ती मनात ठासून भरली गेली आहे. त्यात बंडखोर अन विद्रोही स्वभाव असल्याने मी कळत-नकळत अनेक सामाजिक चळवळीकडे आकर्षित झालो, अनेक आंदोलन, मोर्चात सहभागी झालो व काही मोर्चे, आंदोलन आयोजित पण केले.

◆ संधी मिळेल तिथे राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून अनेक आमदार, खासदार, अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नांसाठी जाब विचारला, अनेक सामाजिक उपक्रम राबवले.
(विश्वास बसत नसल्यास सर्व गोष्टी माझ्या फेसबुकवर आहेत त्या पहाव्यात किंवा मला ओळखणाऱ्या गावातील, कॉलेजमधील इतर कोणालाही विचारून खात्री करावी ही नम्र विनंती).

शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, अन सोशल मीडियावर वेळोवेळी तरुणांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. प्रसंगी स्वतःची डिग्री विकायला काढुन देशातल्या बेरोजगारीला वाचा फोडली.

● या समस्यांच्या मुळात जाताना सहज एक गोष्ट जाणवली की राज्यातील 288 आमदार लोकांपैकी 2-4 अपवाद सोडले तर एक ही सर्वसामान्य माणुस विधानसभेत नाही मग आपले प्रश्न कोण मांडणार ??
केंद्रात ही अशीच परिस्थिती आहे.
40-40 वर्षे झाली एकाच घरात सत्ता आहे. मतदान करणारे सर्व सर्वसामान्य असताना सुद्धा ते एकाही सर्वसामान्य माणसाला निवडून देत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

शिवाय अनेक आमदार-खासदारांच्या पोरांना दोन शब्द नीट लिहता येत नाहीत की बोलता येत नाहीत.
अन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या युवराजाला आपल्या समस्या कळत देखील नाहीत तरी देखील आपण त्यांचे चमचे का होतो हेच मला कळत नाही !!

● सर्व सामान्य लोकं हिंमत करत नाहीत म्हणुन हे सगळं चालु आहे. असं असताना गप्प बसणं माझ्या रक्तात नाही त्यामुळे मी येणारी विधानसभा लढण्याचा निर्णय केला आहे. माझ्या पाच पिढ्यात कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. तरी देखील मी हा निर्णय घेतला आहे.

◆ मी काय करणार हे इथं फक्त दहा-पाच टक्के मांडले आहे ते तुम्ही पूर्णपणे वाचाल अशी आशा करतो.

◆ मी चांगदेव गिते वयक्तिक सोडला तर माझ्या घरातील कोणीही सदस्य (आई, बहीण, बायको) भविष्यात कधीच निवडणुक लढवणार नाहीत किंवा त्यांना पुढं करून मी घराणेशाही करणार नाही.

माझ्या शरीरात एका माजी सैनिकाचं अन शेतकरी आईचं रक्त असल्याने त्यांची शप्पथ घेऊन सांगतो आमदार झाल्यावर उभ्या आयुष्यात एक रूपयाचा देखील भ्रष्टाचार करणार नाही.

◆ मला जेव्हा पैसे कमी पडतील तेव्हा लोकांकडून हक्काने मागुन घेईल.
किंवा इतर काही व्यवसाय करून, पुस्तके लिहुन पैसे ही कमवेन. भ्रष्टाचाराचा एक भी रुपया खाईन तर माझ्या माय-बापाचं रक्त पीईन. जीव देईल पण माझ्या मातीच्या अन मातेच्या दुधाशी गद्दारी करणार नाही.

◆ ही सडलेली यंत्रणा मी एकटा शुद्ध करू शकत नाही किंवा इतरांचा भ्रष्टाचार मी थांबवू शकत नाही तरी देखील या गडूळ पाण्यात पान निवळी प्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील.
त्यामुळे तुमची साथ हवी आहे.

◆ शक्यतो माझ्या मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला मी वर्षातून किमान एकदातरी भेट देईल.
(जे आतापर्यंत कोणीही केलं नसेल)

◆ प्रत्येक गावातला सरकारी कर्मचारी म्हणजे ( उदा. तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस पाटील, कोतवाल ) गावात वेळेवर येईल अन लोकांकडून कसलेही पैसे घेणार नाहीत या करिता मी प्रत्येक कार्यालयात CCTV बसवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पहिल्याच भेटीत करेन शिवाय त्या कर्मचाऱ्यांवर वचक/लक्ष ठेवील.

◆ संपुर्ण राजकीय जीवनात कधीच कोणाला दारू पाजुन मतदान करायला सांगणार नाही, किंवा दारू पाजनार नाही अन माझ्या माता-भगिनींचे लेकरं-बाळं, संसार रस्त्यांवर आणणार नाही.

◆ वर्षांतून जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा आम सभा, ग्राम सभा, वार्षिक आढावा बैठक घेतल्या जातील.

◆ मरेपर्यंत मातीचे समीकरणं जुळवत राहील जातीचे नाही.

◆ कुठल्याही प्रकारचे तंटे, भांडणं, दंगे होऊ नयेतच यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.

◆ आयुष्यात कधीच द्वेषाचं, कपटनीतीचे, खालच्या दर्जाचं राजकारण करणार नाही पण त्याचं बरोबर कोणी आमच्या जीवावरच उठायचा प्रयत्न करत असेल तर त्याला ही सोडणार ही नाहीच व माझ्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप खपवुन घेतला जाणार नाही.

◆ माझा पुर्ण आमदार निधी हा लोकांच्या सांगण्यानुसारच खर्च केला जाईल.

ऊसतोड कामगार, मजुर, शेतकरी अन आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबाला दर महा 2 हजार रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न करेन.

माझा मुलगा-मुलगी हे सर्वसामान्य जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिकतील.

आमदार म्हणुन मिळणाऱ्या पगारातुन दरवर्षी अनाथ असलेले 5 विद्यार्थी शिकवले जातील.

शक्यतो सामुदायिक लग्न सोडले तर, साखरपुडा, वास्तू शांती, मुंज असल्या कार्यक्रमाऐवजी दवाखाना, शाळा, अपघात या कडे जास्त लक्ष दिलं जाईल.

◆ शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान या सोबतच हमी भाव देखील भेटला पाहिजे याकरिता पूर्णपणे प्रयत्न करेन.

टीप – हे फक्त पाच-दहा टक्के आहे, राहिलेलं 95 टक्के व्हिजन अन अजुन बऱ्याच गोष्टी मी मुख्य जाहीरनाम्यात ऍड करेन त्यासाठी तुम्हा सर्वांचे सल्ले, मत नक्की कळवावे.

● तर माझ्या मित्रांनो प्रस्थापित लोकांविरुद्ध साधं बोलणं देखील किती अवघड याची तुम्हाला कल्पना आहे अश्या परिस्थितीत मी जीवाची पर्वा न करता त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरतोय.

◆मी सध्या वंचित आघाडी किंवा तत्सम पक्षाकडे तिकीट मागतोय अन त्यांनी तिकीट दिल्यास कुठल्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. अपक्ष लढण्यास मी फारसा इच्छुक नाही पण लोकांनी खंबीरपणे पाठिंबा दिल्यास अपक्ष ही विचार करेन.
त्यामुळे तुमच्या फक्त शुभेच्छाच नाही तर प्रत्यक्ष खंबीर साथ देखील आवश्यकच आहे.

◆ या लढाईसाठी मला प्रत्येकाने एक रूपयापासुन आपली जी इच्छा, कुवत असेल त्याप्रमाणे आर्थिक सहकार्य करा.
(हे पण सांगतो जर समजा काही अपरिहार्य गोष्टीमुळे उदा. फॉर्म बाद होणे वगैरे उमेदवारी कॅन्सल झाल्यास तुमची रक्कम वापस केली जाईल किंवा एखादा अनाथालयाला दिली जाईल.
कोणी ग्राफीक्स, बातम्या, लिखाण, बॅनर, सल्ला, कायदेशीर सल्ला, प्रचाराला वेळ द्या !!
◆ सोशल मीडियावर माजी बाजु मांडा, ट्रोलरला उत्तर द्या, अडी-अडचणीच्या वेळी साथ द्या. तुम्ही जितके सहकार्य कराल त्याच्या डबल मी परतफेड करेन हा शब्द आहे माझा तुम्हाला.
तुम्ही साथ द्या मी बदल घडवुनच दाखवतो.

प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करा.
कारण माझी सगळी यंत्रणा, मित्र, सहकारी, मीडिया, सल्लागार तुम्हीच आहात.

– चांगदेव गिते
SBI शाखा-पाटोदा (जि. बीड)
A/c – 3160 59 66 625
IFSC CODE – SBIN0011509

: phone pay /Google pay No.
– 96 6587 58 15

Connect me on fb – changdeo gite

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!