एका शेतकऱ्याने घेतले ‘हे’ पीक आणि आता कमावतोय लाखोंने..!! जाणून घ्या त्या पिकाबद्दल..

0

सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडी प्रमाणे काही उपजीविकेची म्हणजे पैसे कमावून देणारी क्षेत्र अशी आहेत ज्यांना आपण ह्या कोंबडीची उपमा नक्कीच देऊ शकतो. जसे डॉक्टर होणे, उद्योजक होणे, हॉटेल मालक होणे आणि शेतकरी होणे. काय?? शेतकरी होणे हे का खटकतंय..?? अहो सध्याची शेतकऱ्यांची अवस्थस बघून निश्चितच तुम्हाला विश्वास बसणार नाही पण काही ‘स्मार्ट’ शेतकरी खरोखरीच लाखोंने पैसा कमावतायत..! होय राजस्थानातील एक छोट्या गावात ‘सत्यनारायण यादव’ आणि त्यांची पत्नी संजना यादव यांनी त्यांच्या शेतीचा अंदाज बदलला आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेतले आहे.

कोणते पीक घेतात हे शेतकरी?
काही शेतकरी हंगामी पिकं घेऊन घसघशीत नफा कमावतात हे आपल्याला ठाऊकच आहे. पण श्री व सौ यादव मात्र कोणत्याच पारंपरिक पद्धतीच्या शेती करण्याच्या भानगडीत पडले नसून त्यांची चक्क मोत्यांची शेती चालू केली आहे. ओरिसा मधून ह्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि फक्त १० हजार इतक्याच भांडवलावर आपल्याच गावात मोत्यांच्या शेतीला सुरुवात केली. आता मात्र ते महिना २० ते २५ हजारांच्या वर पैसे कमवत आहेत.

कशी करतात ही शेती?
शेती काशी करतात हे जाणून घ्या आधी मोती कसा तयार होतो हे जाणून घेऊ.
एखाद्या शिंपल्यात जेव्हा रेतीचा किंवा कोणत्याही प्रकारचा कण जातो तेव्हा त्याच्या पासून आपले संरक्षण करायचा शिंपला एक विशिष्ट रसायन त्यावर सोडत राहतो. ते रसायन खूप चमकदार असते. त्या रसायनाचे ठार जमून आत त्या रेती कणाचा मोठा मोती बनतो आणि ह्या मोत्यांना दागिन्यांच्या बाजारात चांगली डिमांड आणि किंमतही मिळते. आता ही झाली नैसर्गिक प्रक्रिया. पण शेती करायची असल्यास खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. एखादा कृत्रिम तलाव किंवा हौद बनवून घ्यायचा.समुद्रातून खूप सारे शिंपले जमा करून आणायचे.त्या शिंपल्यात शल्यक्रियेद्वारे ४ ते ६ मिमी जाडीचे रेतीचे कण किंवा वेगवेगळ्या आकाराचे (गणेश, ओम, बुद्ध, स्वस्तिक) मणी आत सोडून शिंपला परत बँड करून परत पाण्यात सोडला जातो.८ ते १० महिन्यांनी हे शिंपले बाहेर काढून, त्यांकना उघडून, त्यातून बनलेले मोती आपण काढू शकतो.

मोती काढल्यावर हे शिंपले वाया जात नाहीत तर त्यांचा पुन्हा उपयोगही केला जाऊ शकतो आणि ह्या उपयोगातूनही आपल्याला आणखी पैसा मिळतो.हे शिंपले सजावटीच्या वस्तू बनवणाऱ्या लोकांना , कारखान्यांना आपण विकू शकतो आयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या कंपन्या हे शिंपले विकत घेऊन त्याची पूड बनवून औषधात वापरतात करण हा एक चांगला कॅल्शियम चा स्रोत आहे.

म्हणजे मोती आणि शिंपले ह्या दोन्हीचा वापर करून आपण चांगले पैसे कमवू शकतो. श्रीयुत यादव एवढ्यावरच थांबले नाहीत तर ह्याचा प्रचार आणि प्रसारही सुरू ठेवला आहे. कोणीही त्यांच्या कडून ही शेती शिकून घेऊन स्वतःच्या घरी सुद्धा कमी पैशात जास्ती नफा देणारी ही मोत्यांची शेती करू शकतात.

तर मग मंडळी आहे की नाही ही नफ्याची शेती.? जेव्हा पिकांना पाऊस पाणी नसेल तेव्हा ही शेती करून बघायला काहीच हरकत नाही. असे सुंदर मोती मिळतील की तुम्ही पण म्हणाल असावी सुंदर मोत्यांची शेती… चंदेरी सोनेरी चमचमती चांगली..!!

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या परिवाराशी, दोस्त-मित्रांशी, सहकाऱ्यांशी नक्की शेयर करा आणि तुमच्याकडे काही भन्नाट कल्पना असतील तर नक्कीच कॉमेंट मध्ये कळवा.

–  लेखिका: सोनिया हसनबीस

जर तुमच्याकडे काही उपयुक्त माहिती असेल तर आम्हाला starmarathi1@gmail.com वर पाठवा, आम्ही तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!