कपाळाला टिकली लावणे ‘आऊट ऑफ फॅशन’ वाटते? हे फायदे जाणून घेतल्यावर आवर्जून टिकली लावाल..!

0

काय ग हे? कपाळाला टिकली नाही? असे बोडके फिरू नये.. असे मोठ्यांचे सल्ले आपल्याला काही नवीन नाहीत. पाश्चात्य कपड्यांवर टिकली चांगली दिसत नाही हे खरे पण साडी किंवा भारतीय कफयांवर सुद्धा हल्ली टिकली लावणे ‘आउट ऑफ फॅशन’ झाले आहे. पण ही टिकली लावण्याचे फायदे जाणून घेतल्यास भारतीय वस्त्रांवर तरी नक्कीच टिकलीचा वापर कराल..!

Img Source : Google Imgaes

बघा तर काय आहेत फायदे:

१. म्हातारपणाच्या खुणा म्हणजे सुरकुत्या. आणि स्त्रियांची ही सगळयात मोठी भीती..!! भुवयांच्या मधोमध छान भारदस्त टिकली लावल्यावर सुरकुत्या येणाची शक्यता कमीच. टिकली लावा आणि तरुण दिसा..

२. भुवयांच्या मध्ये टिकली किंवा टिळा लावल्यास रक्त प्रवाह म्हणजे सोप्या मराठीत ब्लड सर्क्युलेशन वाढते.

३.भुवयांच्या मध्ये शरीरातील सगळ्या नसा येऊन मिळतात. त्यामुळे त्या भागाला अग्नी चक्र असे म्हणतात. त्यामुळे त्यावर टिकली लावल्यास मॅन शांत राहते. नाहीतर शंकराचे अग्नी चक्र म्हणजेच तिसरा डोळा उघडल्यास काय होते हे आपल्याला ठाऊक आहेच.

४. अग्निचक्राच्या बिंदू वर टिकली किंवा टिळा असल्याचा अभ्यासातही फायदा आहे बरं..! कारण त्याने एकाग्रता वाढते..

५. डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अग्नी बिंदूला मसाग केल्यास बरे वाटते. म्हणून टिकली असल्यास अग्नीबिंदूवर दबाव राहतो आणि डोकेदुखीचे प्रमाण कमी राहते.

६. सायनस वाल्यांनो तुम्ही तर टिकली लावाच.. अग्नी बिंदू हा एक प्रेशर पॉईंट आहे आणि त्यावर दबाव पडत राहिल्यास तुम्हाला सायनस मधून आराम मिळेल. नाकाही चोंदणार नाही.

७. आपल्या मेंदूवर जेव्हा तणाव असतो तेव्हा त्याचा परिणाम ह्या अग्नी चक्रावर सुद्धा होत असतो. हे अग्निचक्र अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे टेन्शन च्या काळात कपाळाला टिकली असलेली बरी. अग्निचक्र शांत राहते.

८. इंसोमनिया म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर टिकली उत्तम. त्याने चेहऱ्याचे, मानेचे पाठीचे आणि शरीरावरचे अनेक स्नायू सुखावतात. आणि तुम्हाला अरराम मिळतो. झोपही शांत लागते.

९. पक्षाघात म्हणजे पॅरलिसिसच्या त्रासामध्ये शिरोधारा ह्या आयुर्वेदिक तंत्राने उपचार केला जातो हे आपल्याला महितच आहे. त्यामुळे ह्या पॉईंट वर टिकली असेल तर आपोआपच हा बिंदू दाबला जातो आणि पक्षाघाताची व्याधी दार होण्यास मदतच होते.

१०. दृष्टी आणि श्रवण ह्या दोन्ही कार्यांमध्ये अग्निबिंदूला दाब दिल्यास मदत होते. दृष्टी आणि श्रावण ह्यांना निगडित सगळे स्नायू रिलॅक्स होतात आणि त्याचे कार्य सुधारते. त्यामुळे सतत कपाळाला टिकली असेल तर श्रावण यंत्र आणि चष्मा दोन्हीचे आगमन नक्कीच काही वर्षे लांबते..

तर मग ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कपाळाला नक्की लावा टिक्का.. टिकली तर टिकली नको तिला टिकवाच..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!