काय आहे राणादा चा फिटनेस फंडा जाणून घेण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

0

टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो.

त्याचा फिटनेस फंडा शेअर करताना राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, “मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही तसेच वर्कआऊट करताना मी एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगा देखील करतो त्यामुळे शरीराला स्टिफनेस येत नाही. तसेच तालमीचे सिन शूट करताना सूर्यनमस्कार करावे लागतात तसेच डीप्स मारावे लागतात त्यामुळे हे व्यायाम जास्त करण्याकडे माझा भर असतो.

हा झाला व्यायामाचा भाग, पण त्यासोबतच डाएट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राणादा हा एक पेहलवान असल्यामुळे त्याची शरीयष्टी ऑनस्क्रीन चांगली दिसली पाहिजे म्हणूनच व्यायामासोबत डाएटवर देखील मी कटाक्षाने लक्ष देतो. माझ्या रोजच्या आहारात पाव लिटर दूध, १ लिटर ताक, १५-२० अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो.” राणादा या व्यक्तिरेखेला सुंदररित्या साकारण्यासाठी हार्दिक घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

 

Tujhyat Jeev Rangala Zee Marathi Serial

Hardik Joshi (Ranada) Photos

Akshaya Deodhar (Anjali Pathak) Photos

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!