Loading...

कारगिलच्या युद्धात ह्या देशाने दिली भारताची साथ.. तर हा बलाढ्य देश होता चक्क शत्रूराष्ट्राबरोबर..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

ह्या वर्षी म्हणजे २६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण होतील.. पण कारगिल युद्धाच्या आठवणी अजूनही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. विजय दिवस किंवा कारगिल दिवस म्हणून साजरा होतो २६ जुलै. पण हे युद्धात आपले बरेच शूर जवान धारातीर्थी पडले, शाहिद झाले. त्यांच्या कुटुंबियांवर आघात झाला. आख्खा देश हळहळला. आपण पाकिस्तानच्या छुप्या खोड्यांचा काटा काढला खरा पण अजूनही आपल्या शहिदांच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.

जवळ जवळ ६० – ७० दिवस चाललेल्या ह्या युद्धात भारताने पाकिस्तानला कारगिलच्या धरती वरून उचकटून फेकले. ह्या युद्धात भारताचा मित्र बनला तो इस्त्राईल देश. इस्राईलनी भारताला सर्वतोपरी मदत केली. मानव विरहित विमाने आणि बोफोर्स तोफेच्या भरण्यासाठीचा दारुगोळा आपल्याला इस्राईल ने पुरवला. स्वतःच्या सॅटेलाइट च्या मदतीने पाकिस्तानी सैन्याचा ठावठिकाणा सांगणारी छाया चित्रे इस्राईलकडून भारताला मिळाली. ह्याचा खूप मोठा फायदा आपल्याला झाला. पाकिस्तान्यांची मोक्याची ठिकाणे उध्वस्त करणे सोपे झाले. असे म्हणतात की जर इस्राईलची आपल्याला साथ नसती तर कदाचित हे युद्ध जिंकणं भारताला शक्य नसतं झालं.

Loading...

आपल्या विरोधात उभ्या ठाकलेल्या पाकिस्तानला मात्र बलाढ्य अमेरिकेची साथ होती. आता अमेरिका स्वतः भारताच्या विरोधात शत्रूदेशाबरोबर उभी ठाकली असेल तर अशा वेळी युद्ध जिंकणं जवळजवळ अशक्यच. त्यातून अमेरिकेच्या हारपून मिसाईल्सला उत्तर देण्यासाठी भारताकडे काहीच नव्हते. अशात अमेरिकेने अजूनही डावपेच रचले. इस्राईल आणि अमेरिका मित्रदेश असल्याने त्यांनी भारताला मदत करू नये असा दबावही अमेरिकेने इस्राईल वर आला. पण भारताशी असलेल्या मित्रत्वाच्या नात्याला श्रेठत्व देत से इस्राईलने आपल्याला लेझर गाईडेड विमान आणि मिरज २००० एच ही युद्धविमानं उपलब्ध करून दिली. भारताला ह्यांचा खूप मोठा फायदा झाला.

ह्या युद्धात अप्रत्यक्षरीत्या अजूनही काही देश आपल्या आणि काही पाकिस्तानच्या दिशेने उभे होते. रशिया, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे देश भारताच्या बाजूने तर चीन, तुर्की आणि अरब देश पाकिस्तानच्या बाजूने. पण ह्या सगळ्यांनाच भारताने निकालात काढले.

Loading...

भारताच्या जमिनीवरून एकेक पाकिस्तान्याला निपटून काढत भारतानेच कारगिल युद्धात विजय मिळवला आणि बलाढ्य अमेरिकेला सोबत घेऊन लढणाऱ्या पाकिस्तानला त्याची लायकी दाखवून दिली..!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.