कुंभ संपताच कुठे गायब होतात नागा साधू ? नागा साधूंचे रहस्य काय आहे ते जाणून घ्या

0

“कुंभ मेळा “ म्हणजे भारतामध्ये ठराविक तीर्थ क्षेत्रात पवित्र नद्यांच्या पवित्र पाण्यामध्ये नागा साधू आणि भारतातले श्रद्धावान भाविक स्नान करून पवित्र झाल्याचा अनुभव घेतात. हा एक मोठा उत्सवच असतो. प्रयाग, नाशिक, उज्जैन, आणि हरिद्वार ह्या ठिकाणी कुंभ मेळा भरतो. समुद्र मंथन करून अमृत ज्यावेळी देवांच्या हाती लागले त्यावेळी राक्षस आणि देव यांच्यात संघर्ष झाला आणि त्या अमृताचे काही थेंब प्रयाग, नाशिक, उज्जैन, आणि हरिद्वार इथल्या नद्यांमध्ये पडले म्हणून ह्या पाण्याला अतिशय पवित्र मानले जाते.

म्हणून इथे हे नागा साधू अंगाला भस्म फासून कोणतेही कपडे अंगावर न घालता येतात. कारण ते १२/१२ वर्ष खडतर तप करतात. ह्या तपामुळे त्यांच्यात स्वतःच्या शरीरा बद्दल , देहाबद्दल काही आकर्षण राहत नाही, ते मनाने आणि देहाने पवित्र होतात. म्हणून ते कपडे न घालता फिरतात. आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांना ते विचित्र वाटते.

naga

मग हे खडतर तप म्हणजे नक्की काय असते ? ह्या साधूंचे अनेक लहान मोठे जथे असतात. त्या जथ्यांना आखाडा म्हणतात. ह्या आखाड्याचा एक प्रमुख असतो त्यांना कोतवाल म्हणतात . आणि हे कोतवाल आखाड्याची नियमावली बनवतात आणि साधूंना त्या नियमात रहावं लागतं. कोतवाल त्या त्या साधूंना शिक्षण देतात, हे सुद्धा खडतर शिक्षण असतं. अनेक वर्षे हे शिक्षण घेऊन तयार झालेल्या साधूंना मग खडतर तप करायला पाठवलं जातं.

१२ वर्ष मन एकाग्र करून ते ध्यान करतात, त्या साधूंना सिद्धी प्राप्त होते. त्यामुळं ह्या साधूंना सर्व सामान्य लोकांसारखे शरीराचे किंवा संपत्तीचे, आकर्षण राहत नाही. त्यांना कशाची भीती राहत नाही. थंडी, वारा, ऊन , पाऊस ह्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. आखाड्यात असताना हे साधू कुठेही प्रवास करताना रात्री करतात. आणि दिवसा जंगलामध्ये फळं, कंदमुळं खाऊन राहतात. काही साधू भगवे वस्त्र घालून भिक्षा मागून राहतात. पण जंगलात , गुहेमध्ये राहतात. तप करताना हिमालयात जाऊन गुहेत राहून तप करतात. ह्या त्यांच्या जंगलात राहण्यामुळे, आणि हिमालयात तप करण्यामुळे हे साधू आपल्याला कधीच दिसत नाहीत.

कुंभ मेळ्यात फक्त हे वेगवेगळे आखाडे शाही स्नान करण्यासाठी नदीवर येतात. अंगाला भस्म म्हणजे पूर्ण वैराग्य. भगवान शंकराची भक्ती करतात , कुठल्याही मोहात हे साधू अडकत नाहीत. ते कोणत्याही गावात जाऊन राहत नाहीत. ह्या साधूंसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था केलेली असते.

गंगा, यमुना, सरस्वती, किंवा गोदावरी नदीत डुबकी घेतली की सगळी पापे धुवून जातात असा समज भाविकांमध्ये दृढ आहे. ही श्रद्धा आहे. ‘काही लोक म्हणतात पापं करायची आणि गंगा नदीत डुबकी घ्यायची म्हणजे पुन्हा नवीन पापं करायला मोकळे’. मनात पाप असणाऱ्यांची पापं धुतली जात असतील का? तर निश्चितच नाही. काही पापं नकळत घडतात आपल्या हातून , तीच धुतली जात असतील. कारण चुकीला माफी नाहीच. ती आपल्या पापाच्या अकाउंटवर वाढतच जातात हे कोण सांगणार?

India Kumbh

ह्या नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान करून मन, बुद्धी, पवित्र करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास तेही पवित्र होऊ शकतात, म्हणून हे स्नान करणे महत्वाचे ठरते. सिद्धी प्राप्त झालेले हे साधू दर अर्ध कुंभ मेळ्यात आणि कुंभ मेळ्यात आवर्जून स्नान करायला येतात . कारण तप करून मिळवलेली सिद्धी कायम टिकून राहावी, आणि मन आणि बुद्धी पवित्र राहावी म्हणून ह्या कुंभ मेळ्याला महत्व आले आहे.

हे स्नान करून परत हे साधू आपल्या गुहेमध्ये, जंगलात जातात आणि ध्यान अवस्थेत पुढच्या कुंभ मेळ्यापर्यंत आपली दिनचर्या करत राहतात. त्यामुळे हे साधू पुन्हा आपल्याला कुठेही दिसत नाहीत.हे कोणाला कसलाही त्रास देत नाहीत. ह्यांना अघोरी साधू म्हणतात. कारण हे वेगवेगळ्या प्रकारे तप करतात. कोणी झाडावर बसून , कोणी पाण्यात उभे राहून , कोणी एका पायावर उभेराहून, वर्षानुवर्षे तप करतात. आणि वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!