Loading...

चहा ह्या पेयाला उगीच नाही अमृततुल्य मानलं गेलंय..! जाणून घ्या याचेही काही फायदे..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

चहा म्हणजे भारताचे राष्ट्रीय पेयच जणू..!! कोणाकडे पंचपक्वान्नाचे जेवण नाही मिळाले तरी चालेल पण चहा नाही मिळाला तर चार चौघात ‘इज्जत’ का सवाल बनू शकतो इतके ह्याचे महात्म्य.. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा चहा नामक औषधाचा डोस सगळ्यांना लागतोच.. फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा टपरी वरचा चहा आपल्याला जास्ती आवडतो कारण त्याची चवच न्यारी असते. चहा घेतल्याशिवाय कित्येकांची सकाळ होत नाही की कित्येकांना ‘प्रेशर’ येत नाही. म्हणजे त्रिफळा चूर्णाचे काम देखील चहाच करतो म्हणा ना..! कॉलेजचे लेक्चर असो, ऑफिस ची मीटिंग असो किंवा मित्रांचा कट्टा ‘चाय कटिंग’ पाहिजेच..

art_chaiwala

आपण रोज चहा पितो आणि नकळत त्याचा शरीराला फायदाही होत असतो. कोणते फायदे होत असतील चहाने नक्की..?? बघूयात तर..

Loading...

१. चहा आपल्या शरीरावर होणाऱ्या प्रदूषणाचा प्रभाव कमी करतो. म्हणजे ह्या हल्लीच्या प्रदूषणयुक्त जीवनमानामध्ये चहा उत्तम..

२. अंगाला येणार घामाचा वास चहा कमी करते. त्यामुळे घामामुळे होणाऱ्या रोगांपासून आपसूकच बचाव होतो.

३. चहामुळे हाडे देखील मजबूत होतात.

४. हार्ट स्ट्रोक ची जोखीम चहा मुळे कमी होते. म्हणजे ज्यांना हृदय विकारांपासून दूर राहायचं आहे त्यांनी इतकं घटक व्यसनं बंद करून रोज थोडा थोडा तरी चहा घ्यावा.

५. ग्रीन टी सारखे पर्याय शरीरावरचे अनावश्यक चरबी घटवायलाही मदत करतात. म्हणजे डाएट करत असाल तर चहा घ्यायला हरकत नाही.

Loading...

६. चहा मध्ये पॉलिफिनाल आणि अँटी ऑक्सिडेंटस असल्याने कॅन्सर सारख्या रोगांना दूर ठेवण्यास मदत होते.

Tea-HD-Cover

एवढंच काय तर चहा ने आपल्याला जी तरतरी येते त्याला तोड नाही. पहाटे उठून अभ्यास करायचा झाल्यास चहा घेऊन बसले तर अभ्यास पक्का लक्षात राहतो असे खूप जणांचे म्हणणे आहे. पण एवढे मात्र खरे की चहाच्या सेवनाचे प्रमाण नियमित आणि संतुलित असावे. उगीच दहा बारा कप चहा ढोसत असाल तर ऍसिडिटी शिवाय काहीही मिळणार नाही. चहा बनवताना त्यात योग्य प्रमाणात आयुर्वेदिक घटक ही मिसळवेत म्हणजे आलं, इलायची, गवती चहा किंवा तुळशीची पाने इत्यादी आणि हे सगळं एक मिनीटापेक्षा जास्ती उकळू ही नये. असा योग्य मोजमापात केलेला चहा कसा अमृततुल्य लागतो ते आपल्याला माहीतच आहे.. तर मग होऊन जाऊद्या एक कटिंग चाय..!!

जर तुम्हालासुद्धा चहा आवडत असेल आणि चहाचे सांगितलेले हे फायदे तुम्हाला महत्त्वाचे वाटले असतील तर शेयर करा आणि अश्याच माहिती साठी आम्हाला फॉलो करा.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.