‘टच द सन’‘ झेपावले सूर्याकडे’, नासाने उचलले ऐतिहासिक पाउल !

0

वॉशिंग्टन – नासाने आत्तापर्यंत अंतराळातील संशोधनात खूप मोठा मोलाचा वाटा उचलला आहे अशातच नासाने उचललेले नवीन पाउल हे उल्लेखनीय ठरले आहे. सोलर पार्क प्रोब नावाचे नवीन अंतराळयान नासाने अवकाशात सोडले असून हे यान सूर्याची जवळून तपासणी करणार आहे. आतापर्यंत चंद्रावर, आणि मंगळावर यान पाठवण्याची कामगिरी नासाने केली होतीच, पण थेट सूर्याच्या खूप जवळ यान पाठवण्याचे धाडसी पाउल या वेळी नासाने उचलले आहे.

सोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून रविवारी दुपारी एक वाजता  हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. ह्या यानाची निर्मिती सूर्याची जवळून तपासणी करण्यासाठी झाली असून सूर्यामध्ये जे काही गूढ स्फोट होतात त्यांचा जवळून अभ्यास हे यान करणार आहे. पुराणकाळातही ‘झेपावे उत्तरेकडे’ असा उल्लेख आहे , मारुतीरायांनी लहानपणी लाल फळासारख्या दिसणाऱ्या सूर्याकडे त्याला गिळण्यासाठी झेप घेतली होती अशी नोंद इतिहासात आहे.

सोलर पार्क प्रोब हे यान सूर्याच्या दिशेने निघाले असून याचा आकार एखाद्या कारसारखा आहे. सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल इतक्या अंतरावरून सूर्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास हे यान करणार आहे. महत्वाची गोष्ट अशी कि सूर्याची उष्णता आणि त्याचा अति प्रखर प्रकार यांना आजपर्यंत कधीही या यानाने तोंड दिलेले नाही आणि म्हणूनच हे नासाचे धाडसी पाउल ठरले आहे.

हे उड्डाण शनिवारी होणार होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे उड्डाण एक दिवसासाठी लांबणीवर पडले आणि रविवारी याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. उड्डाण झाल्यानंतर काही महिन्यांनी हे यान सूर्याजवळ पोहोचेल. मानवनिर्मित कोणत्याही वस्तूंपेक्षा सूर्याची
जवळून पाहणी करण्याची या यानाची क्षमता जास्त आहे. अनेक नवीन उपकरणांनी युक्त असे हे यान २०२४ पर्यंत सूर्याभोवती एकूण सात प्रदक्षिणा घालेल.

सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून या यानाचे संरक्षण करण्यासाठी नासाने खूप उपाययोजना केल्या आहेत. नासाचे हे सूर्य स्पर्श मिशन ऐतिहासिक ठरणार आहे कारण सूर्याच्या इतक्या जवळ जाण्याचा हा पहिला प्रयत्न आतापर्यंत नासाकडूनच केला गेला आहे. साधारणपणे डिसेंबरच्या दरम्यान हे यान अभ्यास पूर्ण करून परतीचा प्रवास सुरु करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!