तांब्याच्या भांड्यातलं पाणी रोज प्यायल्यामुळे शरीराला काय काय फायदे मिळतात ते माहिती आहे का तूम्हाला?

0

आपले आजोबा पणजोबा तब्येतीने किती मजबूत असायचे नाही..? कारण आपली आज्जी नि पणजी पूर्वी पिण्याचं पाणी साठवायला तांब्याची भांडी वापरायची. त्यामुळे पूर्वीचे हे लोक आपल्या पेक्षा तब्येतीने ठणठणीत असायचे. त्यांना सारखा दवाखाना गाठायला लागत नव्हता. पण आता प्लास्टिक, आणि स्टील च्या भांड्यांनी त्यांची जागा घेतल्यामुळे काही काही आजार सतत आपल्या बरोबरच राहायला लागले आहेत.

हे आपल्या न कळत होतंय त्यामुळे कशामुळे काय आजार झालाय हे लक्षातच येत नाही. मग डॉक्टर कडे मोठमोठया रांगा दिसतात. घर सगळं आधुनिक वाटावं म्हणून हे बदल झालेत, पण त्याचे काही परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला लागतात हे खरं वाटत नाही, पण सतत काहीतरी आजार चिकटलेलाच असतो.

अगदी छोटे छोटे आजार सुद्धा आपल्याला त्रास द्यायला लागलेत. किचनमधल्या अधुनिकतेबरोबर शरीर सुद्धा आधुनिक होतंय आणि आधुनिक आजारांना निमंत्रण देतंय. मग हे कसं काय बुवा ? प्लास्टिक किंवा स्टील ची भांडी आपल्या शरीराला काहीच देत नाहीत. ती फक्त किचनची शोभा वाढवतात. आणि साफ करायला सोपी असतात म्हणून त्याचा वापर जास्त व्हायला लागलाय.

लोखंडाची कढई, किंवा लोखंडी तवा आपल्या शरीराला लोह मिळायचं म्हणून वापरात होता, तांब्याची शक्ती तर खूपच मोठी, ह्या तांब्यामुळे पाणी भारलं जातं, चांदीच्या भांड्यात सुद्धा तीच शक्ती आहे, हे भारलेलं पाणी शरीरात ऊर्जा निर्माण करतं. ही ऊर्जा काय काम करते?

१- सगळ्यात फायद्याची गोष्ट म्हणजे जर आपण रोज तांब्याच्या भांड्यातलं पाणी रोज प्यायलो तर आपली स्किन चांगली निरोगी होते. नितळ होते , चमकदार होते.

२- पचनक्रिया सुधारायला खूपच मदत होते. म्हणजे इलेक्टरीक पॉवर मिळल्यासारखी शरीरातली मशिनरी काम करायला लागते. अन्न पचन सहज व्हायला मदत होते. कारण काय तर ह्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पाण्यामुळे ऍसिडिटी आणि गॅसेस चा त्रास होत नाही आणि अन्न छान पचायला लागतं.

३- थायरॉईड चा त्रास असलेल्या लोकांना हे पाणी रामबाण ठरते. तांब्यातलं कॉपर थायरेकसिन, हार्मोन्स बॅलन्स करते आणि थायरॉईड चा धोका टळतो.

४- शरीराचं जास्त झालेलं वजन कमी करायला रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी ८/१० तास ठेवलेलं पाणी खूपच उपयुक्त ठरतं.

५- बॅक्टेरिया नष्ट करतं हे पाणी. ह्या तांब्याच्या भांडतल्या पाण्यात अँटी बॅक्टेरियल गुण तयार होतात आणि पाण्यातल्या खराब बॅक्टेरिया चा नाश होतो, डायरिया, जुलाब, कावीळ आशा रोगांपासून बचाव करण्याची ताकत ह्या पाण्यात आहे.

६-तांब्याचे गुणधर्म असलेले हे पाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्यास सांधे दुःखी पासून आराम मिळतो. आणि कामे करायला उत्साह निर्माण होतो.

७- ऍनिमिया किंवा शरीरात रक्त कमी असेल तर तांब्याच्या भांड्यात ८/१० तास ठेवलेलं पाणी रोज प्यायल्यास रक्त वाढीला मदत होते. रक्तातले दोष नाहीसे होतात.

एवढे सगळे फायदे जर फक्त तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या ह्या पाण्यामुळे मिळत असतील तर हे पाणी प्यायला कोण नाही म्हणेल? आणि हे सगळे फायदे पूर्वी लोकांना मिळत होते म्हणून पूर्वीचे लोक निरोगी आणि सुदृढ होते. मग आता करा आजपासूनच सुरुवात. मिळवा हे सगळे फायदे आणि राहा निरोगी.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!