तुम्हाला माहिती आहे का मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ?? तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पाहू बघून घ्या .

0

मित्रांनो निवडणुका जवळ येत आहे लोकसभा निवडणूक २०१९ मध्येच होणार , हे स्पष्ट झाले असून, त्या निवडणुका मार्च महिन्यात होणार की, मे महिन्यात एवढाच निर्णय होणे बाकी आहे. आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार देश असून तरुणांचे प्रमाण आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहे, मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असले तरी मोठ्या प्रमाणावर तरुण या कडे पाठ फिरवतात कधी कधी या मागे मतदार यादीत नाव नसणे हे सुद्धा कारण असते त्यामुळे आजकालच्या तरुण मुलं मुलींना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची पण माहिती घेता यावी यासाठी शासनाने आता अश्याप्रकरची माहिती अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे पण नेमके कश्या पद्धतीने हि माहिती घायची खाली दिलेल्या माहितीचा उपयोग करा .

आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पाहू शकता . कारण ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पाहा.

मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहाण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता Chief Electoral Officer, Maharashtra यांचा नावाने तुम्हाला एक वेब पेज दिसेल

Click Here

असं पाहाल आपलं नाव – खाली दिलेल्या माहितीचा उपयोग करा .

वरील बटणावर क्लिक केल्यानंतर आपण इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाल.
साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय उपलब्ध असतील.
त्यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील.
त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
त्या पुढचा पर्याय Select Assembly. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
त्यानंतर तुमचे नाव टाका.
त्यानंतर तुमचे आडनाव टाका.
त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
हे सर्व रखाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल.
याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहाता येणार आहे.
नाव न आल्यास-

आपले नाव यादीत दाखवत नसल्यास आपल्या नावाची स्पेलिंग चेक करा.

एसएमएसद्वारे आपल्या नावाची खात्री करा-
तुमची नावं मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे ‘SMS’. एसएमएसद्वारे आपल्या नावाची खात्री करून घेण्यासाठी टाईप करा epicid<space> तुमचा 10 अंकी मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा आणि पाठवा 9869889966 या नंबरवर.

मतदार नोंदणी झालेली नसल्यास मतदार नोदणीसाठी नवीन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे त्यामुळे यादी मध्ये तुमचे नाव नसल्यास तुमचा मतदार यादी मध्ये नाव सामाविस्ट करण्यासाठी नवीन अर्ज दाखल करा .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!