तुम्हाला माहिती आहे का समृद्धी महामार्गा बांधण्यासाठी सरकारने निवडलेले ते १३ कंत्राटदार कोण आहेत ?

0

मित्रांनो नागपूर -मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गाच्या pre – construction म्हणजेच सफाई / सपाटीकरण मशीन ट्रक्स नेण्यासाठी रस्ते भराव टाकणे याचं काम युद्ध स्तरावर सुरु झालेलं आहे , त्यामुळेच या प्रकल्पाच्या १३ कंत्राटदारांची अधिक माहिती देणारा हा लेख आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय . नजीकच्या भविष्यात महाराष्ट्राचीच नव्हे तर किंबहूना देशाच्या विकासाची दिशा बदलणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकत्याच काही महत्वाच्या घोषणा केल्या.

प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी १३ अर्हताप्राप्त कंत्राटदारांची नावे घोषित केली तसेच ८०% हून अधिक जमीन प्रकल्पाच्या कामासाठी खरेदी करून प्रकल्पाच्या कामाला वेग मिळवून दिला आहे.

१३ कंत्राटदारांच्या जाहीर झालेल्या नावांसंदर्भात अधिक माहिती देणारा हा लेख..

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदारांना निवडण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १८ वित्तीय निविदांपैकी कमीत कमी बोली लावणा-या (एल-1) १३ अर्हताप्राप्त कंत्राटदारांची नावे ३१ मे २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) जाहीर करण्यात आली.

आता या संबंधित कंत्राटदारांबरोबर प्रस्तावित कामाचे स्वरूप आणि त्यासाठी होणारा अपेक्षित खर्च यावर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभाचे आदेश महामंडळातर्फे देण्यात येतील. या १३ कंत्राटदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या एकूण १६ पैकी पहिल्या १३ विभागांचे काम पूर्ण करण्यात येईल. तर उर्वरित ३ विभागांच्या कामाची वाटणीही येत्या काळात याचप्रमाणे करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. संबंधित १३ कंत्राटदारांची नावे नावे आणि त्यांना बांधकामासाठी वितरित करण्यात येणार असलेला विभाग यांची यादी पुढीलप्रमाणे आहे :

विभाग १ : नागपूर : मेघा इंजिनीअरिंग, हैद्राबाद


विभाग २ : वर्धा : ऍफकॉन्स


विभाग ३ : अमरावती : एनसीसी, हैद्राबाद


विभाग ४ : वाशिम पूर्व : पीएनसी इन्फ्राटेक


विभाग ५ : वाशिम पश्चिम : सद्भाव इंजिनीअरिंग


विभाग ६ : बुलडाणा पूर्व : ऍप्को
विभाग ७ : बुलडाणा पश्चिम : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
विभाग ८ : जालना : माँटेकार्लो


विभाग ९ : औरंगाबाद पूर्व : मेघा इंजिनीअरिंग, हैद्राबाद


विभाग १० : औरंगाबाद पश्चिम : एल एँड टी


विभाग ११ : अहमदनगर : गायत्री प्रोजेक्ट्स


विभाग १२ : नाशिक पूर्व : दिलीप बिल्डकॉन ,भोपाळ


विभाग १३ : नाशिक पश्चिम : बीएससीपीएल


एकीकडे कंत्राटदारांना कामाचे वाटप करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु असून दुसरीकडे परस्पर संमतीने सरळ खरेदी योजनेच्या माध्यमातून जमीन खरेदीने ही वेग घेतला आहे. खाजगी व सरकारी मिळून सुमारे ८०% हून अधिक जमीन खरेदी करण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांचा आणि जमीन मालकांचा या सरळ खरेदी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कुठलाही नवा प्रकल्प म्हटला की त्यासाठीची जमीन खरेदी आणि प्रत्यक्ष कामाचे वाटप हे संबंधित प्रकल्पाचे मुख्य आणि महत्वाचे टप्पे मानले जातात. हे टप्पे नुकतेच समृद्धी प्रकल्पाने पूर्ण केले असून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!