थंडीच्या दिवसात तरुणांनी खायला पाहिजे हे ड्रायफ्रुट, फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल.

0

निरोगी आरोग्याची गरज कुणाला नाही. जन्माला आलेल्या कोणत्याच माणसाला असं वाटत नाही कि आपण नेहमी आजारी आणि कमजोर रहावं आणि माणसाला नेहमी निरोगी ठेवण्यात फळांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणतात ना “भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास” एकदम तसंच. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे अश्या काही फळांबद्दल. ज्यांना खाल्ल्याने तुम्हाला आपले शरीर नेहमी निरोगी ठेवण्यात मदत होईल.

Image Credits: Google Image Search

 

किशमिशचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. लहान-लहान पण एकदम रसाळ फळ. किशमिश देशात सर्वत्र उपलब्ध असते. आपल्या घरातही सहजासहजी उपलब्ध राहते. त्याला साठवून ठेवण्यातही जास्त त्रास होत नाहीच. त्याचा वापर पेढे-मिष्ठानने बनविण्यात केला जातो. किशमिशचे पोषक घटक माणसाला नेहमी निरोगी ठेवण्यात मदत करते.

Image Credits: Google Image Search

बरोबर ओळखलं, आज मी तुम्हाला किशमिशचेच आरोग्यासाठी होणारे फायदे सांगणार आहे. किशमिश मध्ये झिंक जिंक, कैल्शियम, विटामिन आणि कार्बोहाइड्रेट असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. किशमिशमध्ये समाविष्ट असणारे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज शरीराला गरजेची असणारी उर्जा प्रदान करते.

रात्री किशमिश पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटीच खाऊन घ्यायचे. असं केल्याने संथ पडलेल्या शरीराला स्फूर्ती मिळते आणि तात्पुरता असलेला अशक्तपणा दूर होतो.

Image Credits: Google Image Search

भिजविलेले किशमिश खाल्ल्याने अन्नपचनच्या क्रियेला वेग मिळतो. शरीराच्या वजनात वृद्धी होते. जर तुम्ही सड-पातळ असला तर तुम्ही रोज किशमिश खायलाच पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्याने पोट साफ होते. या व्यतिरिक्त केस गळणे थांबविण्यासाठी मदत करतं, शरीरातल्या पीएचची पातळी स्थिर करतं आणि डोळ्यांची नजरही तीक्ष्ण करण्यात मदत करते.

 

जर तुम्हाला किशमिशचे आणखी फायदे माहिती असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर हा लेक तुमच्या हिताचाही असेल तर तुमच्या परिवाराशी, दोस्त-मित्रांशी, सहकाऱ्यांशी शेयर करा; कारण तुमच्या सभोवताली लोकं निरोगी राहतील तर तुम्ही सुद्धा निरोगी रहाल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!