थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

0

शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वच विभागांमध्ये थंडीचा कहर पहायला मिळत आहे. सरासरी ५℃ ते १५℃ तापमानाची नोंद दिसून येते. अशा कमी तापमानाचा पिकांवरती अनिष्ट परिणाम पहायला मिळतो. थंडीचे पिकांवरती होणारे दुष्परिणाम व करावयाचे उपाय यांवर आपण थोडी माहिती घेणार आहोत.

दुष्परिणाम :-

१. अति थंडीमुळे पानांचा आकार कमी होणे, पानांचा रंग निळसर होणे, झाड कोमजल्यासारखे दिसणे.

२. झाडांची श्वासोच्छ्वास ( Respiration ) क्रिया मंदावणे.

३. प्रकाशसंस्लेषण ( photosynsthesis ) क्रिया मंदावणे.

४. पेशी गोठणे व त्यामुळे एकंदरीत झाडाच्या सर्वच भौतिक क्रियेत बदल होणे.

उपाय :-

१. दिवसात अथवा रात्रीत ज्या वेळेला सर्वात कमी तापमानाची नोंद असेल त्या वेळेला प्लॉट ला पाणी देणे ( जमिनीचे तापमान नियंत्रित होते ), फ्लड पाणी दिल्यास उत्तम.

२. झाडावर पाण्याचा फवारा घेणे ( स्प्रिंकलर देणे – जेणेकरून पानांवरती पाणी मारल्यावर प्लॉट मधील आद्रतेमुळे वातावरणातील तापमानापेक्षा किमान २° से. ने प्लॉट मधील तापमान वाढते. )

३. अमिनो ऍसिड युक्त औषधांचे बोरॉन मध्ये मिसळून फवारे घेणे.

४. ड्रीप मधून नत्र युक्त खते देणे ( चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते ).

५.प्लॉट ची स्टेज पाहून केल्शिअम नायट्रेट चा ड्रीप मधून डोस देणे ( पेशीविभाजन होण्यास मदत )

६. सल्फर चा वापर स्प्रे मध्ये व ड्रीपने करणे ( मुळी गरम राहून क्रियाशील होते ).

७. शक्य असल्यास बागेत ठिकठिकाणी शेकोट्या करणे.

सौजन्य  : शेतकरी सेवार्थ ,कृषी मिञ,सेलू

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!