Loading...

पान खाण्याची सुरुवात कशी झाली? आणि ह्या ‘नवाबी शौक’ चे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती आहेत का?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

पान खाये सय्या हमारो.. म्हणत लाडाने आपल्या नवऱ्याला पान खाऊ घालणाऱ्या नट्या आपण सिनेमात पाहतो. आपल्याला पण पंचपक्वान्नाच्या जेवणानंतर मस्त पान खायची हुक्की येतेच.. मिठा, मसाला, मघई, चॉकोलेट आणि असंख्य प्रकार, पानाच्या टपऱ्या आणि मोठमोठी चौसोपी दुकानात पाहायला मिळतात. अगदी १० रुपयांपासून ते ५००० रुपायांपपर्यंत पानं खवय्यांसाठी उपलब्ध असतात.. उगीच नाही त्याला नावाबी शौक म्हणत.. पण ही पण खाण्याची पद्धत का आणि कधी सुरू झाली असेल बरे..?

 

सगळ्यांना माहिती असेलच की आपल्या शरीराला कॅल्शियम किती आवश्यक आहे ते. शरीराच्या पोषणासाठी जे जे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आपण अन्नातून घेतो ते ते पचवण्यासाठी कॅल्शियमची मदत घेतली जाते. कॅल्शियम ची मात्रा शरीरात योग्य प्रमाणात असेल तरच शरीराला प्रोटीन आणि व्हिटॅमिन चा उपयोग होतो. जर कॅल्शियम ची मात्रा शरीरात कमी असेल तर कितीही प्रोटीन किंवा व्हिटॅमिन घ्या फायदा शून्य. म्हणजे जर सी व्हिटॅमिन शरीराला आवश्यक असेल तर ते घेतल्यावर त्याचा परिणाम दिसण्यासाठी आपल्या शरीरातली मात्रा योग्य असली पाहिजे. तसेच इतर व्हिटॅमिन बाबतीतही तसेच म्हणता येईल.

Loading...

पण कॅल्शियमच्या प्रमुख स्रोतांमधून मिळणारे कॅल्शियम काही कारणांनी शरीराला कमी पडते. मुख्यतः स्त्रियांमध्ये वयाच्या ४० ते ४५ ह्या वयानंतर हेर्मोन्सचे प्रमाण कमी होते त्यामुळे अन्न घटकातून मिळणारे कॅल्शियम कमी पडते. आणि काहीतरी आजार निर्माण होतात. थकवा जाणवतो. म्हणून ४० ते ४५ वयोगटातल्या स्त्रियांना जास्त कॅल्शियम मिळण्यासाठी डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. हे कॅल्शियम हाडांना बळकटी देते. वयाच्या ४० वर्षापर्यंत शरीराचे चयापचय व्यवस्थित होत असते त्यामुळे गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. शरीराचा हालचाल नसणाऱ्या पुरुषांना सुद्धा ४० नंतर ह्या गोळ्या घेण्याची वेळ येते.

 

पण पूर्वी ह्या कॅल्शियमच्या गोळ्या नव्हत्या.. तेंव्हा पान खाण्याचा सल्ला दिला जात असे. कारण आहे त्यातला चुना. ह्या चुन्यातून शरीराला कॅल्शियम मिळते. आता नुसता चुना तर आपण खाऊ शकत नाही. म्हणून पानांतून चुना, कात, लवंग, पाचक सुपारी,वेलची, बडीशेप, ह्या पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पदार्थ घालून खाल्लेले पान म्हणजे औषधी पान ठरले आणि सगळीकडे पण खाण्याची आवड निर्माण झाली.

Loading...

उन्हाळ्यात त्या पानात गुलकंद घातला जाऊ लागला, पावसाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खाण्याचा कापूर घालून पानाची रंगत आणखी वाढत गेली. असं हे शरीराला उपयुक्त पान खाण्याची सवय लोकांमध्ये रूढ झाली. चुना हा उपाय म्हणून वापरला जातो, तो रोज खाण्याने आरोग्य चांगले राहते. म्हणून रोज गव्हाच्या दाण्या इतका चुना पाण्यात मिसळून घेतल्यास हे सगळे फायदे आपल्याला मिळतात.

गरोदर स्त्रियांनी रोज गव्हाच्या दाण्याएवढा चुना पुढचे काही महिने पाण्यात मिसळून खाल्ल्यास शरीर निरोगी राहते, डिलिव्हरी चा त्रास होत नाही, आणि बाळ सुध्दा सुदृढ निरोगी राहते.
म्हणून मंडळी, इतरांना चुना लावण्यापेक्षा तुमच्या पानाला लावा.. त्यात गुलकंद, सुपारी, बडीशेप, चॉकलेट असे छान छान पदार्थ घाला.. आणि भरा की तोबरा..!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.