प्रत्येक शेतकर्यांची ‘सत्यकथा’ नक्की वाचा डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही

0

एक म्हातारे शेतकरी १२०० मेथीच्या जुड्या घेऊन लिलावाला येतात.  बाबांना म्हटलं काहो बाबा तुम्ही आलात दुसरं कोणी नव्हतं का ?  बाबा म्हणाले भाजी काढायची होती. लोड शेडिंग असल्या मुळे पोरग दोन दिवस रात्री भाजीला पाणी भरत होता. पाणी भरताना चिखलात काच घुसली अन घेतला पाय चिरून .  त्याचा कराडा आला होता (म्हणजे ताप होता) अंगात.  मग मी आलो….| अजून लिलावाला एक तास होता. दिवाळीचे दिवस होते. बाबांना म्हटलं झाली का तयारी दिवाळीची.  बाबा म्हटले नाही रे अजून. आजच भाजी काढली. सूनबाईनं बाजार लिहून दिलाय. दोन नाती आहेत त्यांना पण फटाके कपडे घ्यायचे आहे. पोराला पायाला ट्युब घ्यायची आहे.  म्हातारीला चोळी अन मला कोपरी. अन पोरी येतील भाऊबीजेला त्यांची खरेदी.

मी विचारलं गाडी भाडे किती आहे पिंपरी कावळ वरून बाबा म्हणे ८०० रुपये आणि मजूर किती होते भाजी काढायला ९ मजूर होते १८० रुपये रोजाचे मी ,म्हातारी अन सुनबाई बांधायला अन दोन्ही नाती भाजी सावलीला वहायला  म्हणजे घरचे माणस धरून १४ होते…..| लिलाव जवळ आले,  काल परवा पर्यंत तर भाजीला प्रती १०० जुडी ११०० ते १२०० भाव होता.  मी सहज अंदाज लावला की बाबांची १२०० जुडी १००० रुपये म्हणजे १० रुपये जुडी गेली तरी १२००० रुपये येतील. चला बाबांची दिवाळी मजेत जाणार ….|

९ मजूर x १८० = १६२० मजुरी, गाडीभाडे = ८००, मार्केट फी = २००, मेथी बियाणे ८० x ५० = ४०००, खते = १०००, औषधे = २०० ते ४०० आणि रात्रंदिवस केलेले स्वतःचे कष्ट पाणी भरणे गवत काढणे वेगळे…. म्हणजे टोटल खर्च = ७ ते ८००० रुपये असो….! बाबांचा भाजीचा “लिलाव” झाला… ३ रुपये प्रती जुडी….. क्षणात हिशोब झाला ३६०० रुपये…| बाबांनी माझ्याकडे बघितलं…. त्यांच्या आधी माझ्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या… बाबा म्हटले शेवटी नशीब पोरा….. “नशीब”…!!!

सांगा आता , घरी जाताना तो काय उत्तर देणार घरच्यांना…सरकार पैसे देतो आत्महत्या करणाऱ्यांना म्हणून हौस आलीये का त्याला आत्महत्त्या करण्याची… सत्ता कोणाची हे महत्त्वाचं नाही…. शेतकऱ्यांना “न्याय” मिळाला पाहिजे… बस्स…. त्याच्या मागे खंबीर पणे सगळ्यांनी उभं रहा…|

हि भाकडकथा नसून “सत्यकथा” आहे. ती प्रत्येक शेतकऱ्याची “गाथा” आहे… थोतांड वाटत असल्यास एक दिवस एअर कंडिशन गाडी घेवून ग्रामिण भागातील लिलाव मार्केटला “पिकनीक” करुन या.

प्लिज, शेअर करा ….

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!