Loading...

फक्त ७० दिवसात २१ लाखांचं उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याची शेती-पद्धती जाणून घ्याल तर दंग होऊन जाल.

2

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ७०-८० टक्के लोकांचा पहिला व्यवसाय हा शेतीच आहे. म्हणूनच शेतकऱ्याला “उभ्या जगाचा पोशिंदा” सुद्धा म्हटलं आहे. तांत्रिक आणि संगणकीय क्षेत्रात काम करून महिन्याला लाखांत उत्पन्न घेणाऱ्यांचे अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत पण शेती करून महिन्याला सहा अंकी रुपयांत उत्पन्न घेणारे लाखातच एक असतात. चला तर मग आज जाणून घेऊया अश्याच एका व्यक्तीबद्दल ज्यांचं फक्त ७० दिवसांत २१ लाख इतके उत्पन्न असते.

खेताजी सोलान्खी, “एक आणि एक अकरा होतात” या वाक्याला सत्य ठरवणारी व्यक्ती. ओडीसामधल्या या मध्यम वर्गीय शेतकऱ्याने असं काहीतरी केलं ज्याने त्यांना इतका फायदा मिळवून दिला. ४१ वर्षीय खेताजी गेल्या ३ वर्षापासून आलूची शेती करत होते. आलुच्या पिकात त्यांना पुरेसा फायदा झाला नाही; निव्वळ नुकसानच झालं असं म्हणायलाही हरकत नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणून वागणाऱ्या या आलुच्या पिकाऐवजी काहीतरी दुसरं पिक घेण्याचा विचार खेताजींनी केला. शेतात बदल म्हणून आलू उगविण्याऐवजी त्यांनी डांगराची शेती करण्याचा निर्णय केला.

                        Img Source : Jagran
Loading...

७ एकर जागेत डांगराची शेती खेताजींना अशी पिकली जणू लॉटरीच लागली. अवघ्या ७० दिवसातच त्यांना १८० टन इतकं उत्पन्न झालं आणि त्या उत्पन्नाला भरगोस म्हणजेच २१ लाखाचा बाजारभावही मिळाला. हे त्यांच्या मेहनतीचे फळ होतेच पण सोबतच नशिबाचीही साथ होती. ७० दिवसांतच “बेहाल खेताजी” आता “मालामाल खेताजी” झाले होते.

                        Img Source : Jagran

पण त्यांनी हे केलं कसं?
परंपरेनुसार चालत आलेल्या मोटर-पंपची सिंचन पद्धती न वापरता त्यांनी ठिबक-सिंचत पद्धती वापरली. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगून देतो, ठिबक सिंचन पद्धतीत लांब नळ्यांद्वारे झाडांच्या बुढाशी पाणी पोहचवून सिंचन केलं जाते. सोबतच खेताजींनी विजेचा वापर न करता सौरउर्जेचा वापर केला. ज्यामुळे विजेची बचत झाली आणि पैश्यांचीही. खेताजींनी डांगराच्या शेतीत मल्चिंग पद्धतीचा वापर केला. मल्चिंग पद्धतीत जमिनीवर प्लास्टिक पसरवून त्यावर छिद्रे केली जातात. त्याच छिद्रातून बीज आणि खत दिल्या जातं. ज्यामुळे जास्तीचे खत वाया जात नाही आणि झाडांना त्याचा योग्य पुरवठा होतो. त्यांनी या पिकासाठी मिळणाऱ्या सब्सिडीचाही वापर केला. खेताजी सांगतात कि नव-नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी YouTubeची मदत घेतली.

                    Img Source : Jagran
Loading...

काही महिन्यांतच डांगराचे भरगोस उत्पन्न काढणाऱ्या खेताजीकडे आता जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या अनके राज्यातून ग्राहक येतोय. ७वी पास या शेतकऱ्याने नास्जीबाला दोष न देता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचं नशीब लिहिलं आणि भोगीच्या दिवसापासून सुगीच्या दिवसापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आता त्यांच्या क्षेत्रातील अनेक शेतकरी त्यांचं अनुसरण करत आहेत आणि खेताजी सोलान्खी त्यांच्यासमोर एक आदर्श उदाहरण आहेत.

Source : Dainik Jagran,Google.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

2 Comments
 1. Avatar
  Pavan says

  Plz muze mahiti bataye
  9130828797

 2. Avatar
  Suresh Vaman Raul says

  उत्पन्न दाखवताना मशागत कशी केली, खर्च किती आला , काय मेहनत करावी लागली, सबसिडी मिळविण्यासाठी काय काय करावे लागले हे सांगणे पण महत्त्वाचे. आलू, डांगरला मराठीत पर्यायी शब्द आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.