फुलपाखरूमधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा |

0

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या  दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं.लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.

चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहे.प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांनी खूप पसंती मिळत आहे.’होणार सून..’ यामालिकेतील जान्हवीचं तीन पदरी छोटं मंगळसूत्र अनेकींना आवडलं आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात. तसंच वैदेहीचं मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे.

वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आलं आहे        हेमंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके आहे.

यामुळे हे आणखीचर्चेत येण्याची दाट शक्यता आहे”आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखीलसांभाळायचं असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींनाखूप कुतुहल वाटतं. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्रशोभेल असं असलं कीत्यांचा आनंद गगनात मावेनासा असतोयाच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे.” असं प्रिया कळंबे  सांगतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!