Loading...

बहीण मुस्लिम आणि भाऊ हिंदू. भावानं टॅक्सी विकून वाचवला बहिणीचा जीव.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

राजधानी “दिल्ली”, राजधानीत भारतातले सगळी राज्यामधले लोक काही न काही कारणानं जात असतात. कोणी कोणाला ओळखत पण नसतो. पण सगळे येतात काही कामाच्या निमित्ताने, नाहीतर रोजगार मिळवण्यासाठी, आणि मिळाला रोजगार तर दिल्लीतच मुक्काम. असे अनेक जण दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरात पोटापाण्याची सोय म्हणून राहतात. असाच एक उत्तर प्रदेशातला तरुण दिल्लीत येऊन स्वतः ची टॅक्सी चालवायचा.उत्तर प्रदेशातल्या साहरणपुर जिल्ह्यातल्या बखतीयारपूर चा राहणारा.

टॅक्सी चालवायचा, असाच एकदिवस आपली टॅक्सी घेऊन घरातून निघाला, निघायला नेहमीपेक्षा जरा उशिरच झाला होता म्हणून जर गाडीला स्पीड पकडून चालला होता. अचानक रस्त्यात एकाठिकाणी गर्दी दिसली. काहीतरी अपघात झाला होता. राजवीर विचार करत चालला होता की असं काहीतरी रोज घडतच असतं, थांबणार नव्हता, पण राहवलं नाही त्याला, टॅक्सी थांबवली, आणि तिकडे धावला. रस्त्याच्या कडेला एक तरुण मुलगी पडली होती आणि तिच्या डोक्यातून रक्त वहात होतं.

Loading...

विचारलं तर एक कार धडक मारून गेली असं कळलं. सगळे पाहत होते पण कोणाला काय करायचं सुचतंच नव्हतं, राजवीर झटकन पुढं गेला आणि त्यानी त्या मुलीला हातावर उचलून घेतलं आणि आपल्या टॅक्सी मध्ये ठेवलं, आणि टॅक्सी भरधाव सुटली, ती थांबली जयप्रकाश नारायण हॉस्पिटलसमोर. फटाफट राजवीरने त्या मुलीला उचलून आत नेलं. डॉक्टर सुद्धा धावले आणि ताबडतोब उपचार सुरू केले. दोन तासानंतर राजवीरने डॉक्टरना त्या मुलीच्या तब्येतीबद्दल विचारलं तेंव्हा त्यांनी डोक्याला जबर मार लागल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आहे. गंभीर परिस्थिती आहे, डोक्याचं ऑपरेशन करावे लागेल , साधारण २लाख खर्च येईल, आणि तीन बाटल्या रक्त लागेल. लवकर व्यवस्था करा.

इतके वर्ष दुसऱ्याची टॅक्सी भाड्याने चालवणारा राजवीर, नुकतीच ही टॅक्सी त्याने घेतली होती. त्याच्याकडे इतके पैसे कुठून येणार? फोनवर त्याने आपल्या आईला ही हकीकत सांगितली, तर आईने सल्ला दिला की आता तू त्या मुलीला वाचवण्यासाठी दवाखान्यात आणलं आहेस तर तिला काहीही करून वाचवलंच पाहिजे. राजवीर टॅक्सी घेऊन गेला आणि आपली टॅक्सी त्याने ताबडतोब विकली. त्या गाडीचे त्याला अडीच लाख रुपये मिळाले, ते त्याने हॉस्पिटलमध्ये जमा केले.

तीन महिन्या नंतर ती मुलगी त्याच हॉस्पिटलमधून पूर्ण बरी होऊन बाहेर पडली. आपल्या घरी गेली. तिला राजवीरची सगळी माहिती डॉक्टर कडून मिळाली होती. काही दिवसांनी ती राजवीरचा पत्ता काढत आली त्याच्या घरी, एक झोपडीवजा घर तिथं तिला एक वयस्कर महिला भेटली, ती होती राजवीरची आई. तिने राजवीर बद्दल विचारले, तो किराणा दुकानात गेला होता. ५मिनिटात राजवीर आला, त्या मुलीने त्याला नमस्कार केला, पण राजवीरला लगेच तिला ओळखता आले नाही.

तिने तिचे नाव ‘अशिमा बानो ‘ असे सांगितले, आणि अपघाताबद्दल सांगितल्यावर राजवीरला कळलं. तिनं भाऊ म्हणून राजवीरला मिठी मारली आणि त्याने तिचा जीव वाचवला म्हणून ती त्याच्या समोर नतमस्तक झाली. तीने राजवीर आणि त्याच्या आईला एका मोठ्या समारंभाला येण्याची विनंती केली. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गोल्ड मेडल मिळणार होते त्या समारंभाला तिने त्या दोघांना बोलावले होते. राजवीर ची परिस्थिती फार हालाकीची झाली होती, तो म्हणाला आम्ही काय करणार तिकडे, सगळे मोठे मोठे लोक असणार, आम्ही नाही येत. त्यावर आशिमा म्हणाली की तुमच्या पेक्षा मोठा तिथं कोणीच नाही, तुम्ही आलंच पाहिजे.

Loading...

दुसऱ्या दिवशी राजवीर आणि त्याची आई त्या कार्यक्रमाला गेले. आणि शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले. कारण तिथे आलेली सगळी मंडळी सुटबुटात होती. अशिमाचं नाव घोषित झालं, ती झटकन स्टेजवर गेली, राष्ट्रपती तिला पुरस्कार देत होते पण तिने त्यांना एक मिनिट थांबवलं, हे मेडल मला नाही माझ्या भावाला द्या, आणि ती राजवीर आणि त्याच्या आईकडे धावत आली, त्या दोघांना घेऊन स्टेज वर गेली आणि सगळी हकीकत स्टेजवर सांगून तो पुरस्कार, ते गोल्ड मेडल तिने राजवीरला द्यायची विनंती केली. ह्या प्रसंगाने तिथले सगळेच लोक भारावून गेले. लोकांच्या डोळ्यात पाणी आले.

राजवीर आणि आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ह्या कार्यक्रमा नंतर आशिमा बानो ने तिची इच्छा राजवीर आणि आईला बोलून दाखवली, की मी माझ्या शिक्षणा साठी दिल्लीत राहत होते. माझे वडील होते पण ते दोन वर्षांपूर्वी वारले आता माझे कोणीच नाही .आता माझे हे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता मी माझ्या घरी म्हणजे राजस्थान मध्ये जाणार आहे तुम्ही दोघे सुद्धा माझ्याच बरोबर तिकडे यायचं आहे. आपण सगळे एकत्र राहायचं. आणि आशिमा बानो त्या दोघांना आपल्या गावी म्हणजे राजस्थान मधल्या हनुमान गड जिल्ह्यातल्या जमिरगड ह्या गावी घेऊन गेली.

गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे तिला लगेच मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. आणि तिने राजवीर साठी ताबडतोब एक टॅक्सी घेतली. आज हे बहीण भाऊ एकत्र राहतात आणि सगळी सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. असे हे ” हिंदू- मुस्लिम” “बहीण – भाऊ” ह्यांच्या ह्या नात्याला सलाम.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.