भारताचा पाकिस्तानवर हल्ला बोल असा घेतला पुलवामा चा बदला

0

१४ फेब्रुवारीचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला.. भारताचे ४५ जवान शहीद.. प्रेमदिवसाचा शेवट हा अतिशय दुःखद झाला.. भारत देशच नाही तर भारताचे मित्र देशही हळहळले. पण ती वेळ फक्त हळहळ व्यक्त करण्याची नव्हती तर चोख उत्तर द्यायची होती. आज हल्ल्यानंतरचा १२ वा दिवस आणि भारताने दहशतवादाच्या विरोधात जोरदार पाऊल उचलले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.

यावेळी भारतीय हवाई दलानं जैश ए मुहम्मद च्या दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ए.एन.आय. नं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्येच नाही तर त्याहून पुढे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून, ही कारवाई केली आहे.

भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालाकोट पर्यंत हवाई हल्ले करण्यात आले आहेत. चाकोटी मधील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. असे एकूण १२ तळ नकाशावरून उडवण्यात आले आहेत. मात्र अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे. गनिमी काव्याने शत्रूचा काटा काढण्याची शर्थ भारताकडून सुरू झालेली आहे.

 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. पाकिस्तान आणि भारताकडून दोन्ही बाजुंनी एकमेकांना घेरण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी दिली होती. यावर पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिला होता.

 

काश्मिरात ३ -४ दहशतवादी मारलेही गेले. मात्र त्यानंतरही काल पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तान आगळीक करणे सोडत नसून आज पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे.

पण आता अशी लंगडी उत्तरे देण्यापेक्षा पाकिस्तानला स्वतःहून स्वतःच्या देशात पोसलेला दहशतवाद मोडून काढावा लागेल. नाहीतर भारताच्या आणि इतरही बऱ्याच देशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे नक्की असा संदेश आज भारताने पाकिस्तानला दिलेला आहे..! भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेले हे पाऊल सगळ्यांच्याच कौतुकाला पात्र ठरले आहे. ह्यानंतर पुढे काय होणार आहे ह्याकडे सगळ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे..!!

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!