मी आज तुमच्यासमोर जिवंत उभा आहे तो फक्त बाळासाहेबांमुळे ! पहा कोण आहेत ते व्यक्ती

0

हिंदुह्रदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त  बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे असणारे शिवशाहीर म्हणजेच डॉ. विजय महाराज तनपुरे भक्तीची कहाणी बघूया शिवशाहीर डाॅ.विजय महाराज तनपुरे हे स्वतः अपंग असुन इतर अपंगांसाठी काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निस्सीम भक्ती आणि बाळासाहेबांच्या लाभलेल्या सान्निध्याच्या शक्तीने मी हा यशस्वी प्रवास जगात करू शकलो. हे शिवशाहीर आवर्जुन सांगतात.

अत्यंत कष्ट संघर्ष आणि माझ्यात असलेल्या प्रामाणिकपणा यामुळेच बाळासाहेबांनी मला इतक्या जवळ घेतले बाळासाहेबांकडे प्रत्येक कलाकाराला योग्य तो सन्मान आणि दर्जा असायचा खुद्द बाळासाहेब शाहीर तनपुरे मातोश्रीवर येण्यास निमंत्रण द्यायचे.

बाळासाहेब व शिवशाहीर यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते हे सर्वश्रुत आहे. तब्बल बाळासाहेबांच्या 49 भेटी झाल्या आहेत. आणि प्रत्येक भेट 1.30 ते तास चर्चा रंगायची. बाळासाहेबांची पहिली भेट कोल्हार येथील शिवसैनिक शिवकुमार जंगम यांच्यामुळे झाली. पहिली भेट ही फक्त दोन मिनिटे मिळेल असे ठरले. आणि शाहीर विजय मातोश्री वर पोहोचले आणि साहेबासमोर उभे राहिले.

बाळासाहेबांचे ते सुर्यरूप तेजस्वी अवतार पहिल्यांदा बघितला. साहेबांनी विचारले बोल बाबा काय काम तुझ तेव्हा शाहीर बोलू लागले साहेब मला आपल्या जिवन चरित्रावर पोवाडा करावयाची इच्छा आहे. एवढ्यातच साहेब उत्तरले बाळासाहेब म्हणजे लोकांनी नुसता धंदा केलाय, कोणी भगव्या टोप्या काढतंय, तर भगव्या पट्ट्या. कोणी भगवे पेन काढतय आता तू आला भगवी कॅसेट काढायला.

नाही नाही असं काही जमणार नाही आणि तत्कालीन पी.ए.(P. A.) आता वाटलं सगळे संपले तेवढ्यात शाहीर या शिवसेनेच्या सुर्यासमोर हिम्मत करून बोलू लागले. साहेब आजपर्यंत या अपंगत्वाची कोणीही कदर केली नाही. समाजातून कुचेष्टा आणि अवहेलने शिवाय पदरी काही पडले नाही. मी राहुरी जि.अहमदनगर सारख्या ठिकाण वरुन आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 9 वर्षे लागले.

कित्येकदा याच मुंबईत उपाशी पोटी आणि फुटपाथवर झोपण्याची वेळ माझ्यावर आली. मुंबईत अनेकदा पैश्या अभावी लोकलने मोफत प्रवास करावा लागला. लोकल च्या डब्यातून उतरताना कित्येकदा पडलो आणि लोक मला तुडवत तुडवत निघून गेले.

गावी गेलो तर चेष्टा आणि मुंबईत आलो तर फक्त नि फक्त संघर्ष… यात किती आणि काय काय भोगलं हे तुमच्या सारख्या सामन्यातून असामान्य जिवन प्रवास असलेल्या व्यक्तीस काय सांगावे. एवढ बोलून थांबले असता साहेबांनी विचारले बोला काय पाहिजे तुम्हाला !! साहेब मला आपल्या कडून काहीही अपेक्षा नाही फक्त एकच इच्छा आहे आपल्या जिवन चरित्रावर पोवाडा करण्याची संधी द्यावी जेणेकरून माझ्या आयुष्याचे सार्थक होईल. आणि तिथूनच साहेब आणि शिवशाहीर जूना मातोश्री च्या आतल्या रूममध्ये गेले आणि शाहीर साहेबासमोर गायला लागले आणि साहेब टेबलवर वाजवत ताल द्यायला लागले.

तिथेच साहेब त्यांचे जीवनातील मोजके प्रसंग सांगायला लागले आणि शिवशाहीर हे एखाद्या पत्रकाराप्रमाने लिहायला लागले. पहीली भेट फक्त दोन मिनिटे मिळाली आणि तब्बल तीन तास ही चर्चा झाली. बाळासाहेब मातोश्री मधून फाइव्ह गार्डन येथे रहाण्यास आले असता 6 नोव्हेंबर 1995 साली ही कॅसेट मुंबई येथील चंपक जैन यांनी व्हिनस कंपनी मार्फत रेकॉर्डिंग केली.

आणि तब्बल एकाच महिन्यात पाच लाख कॅसेट विकल्या गेल्या. ज्या मुंबईत निराश होऊन समुद्र किनारी बसायचो त्याच जागी माझा फोटो असलेले मोठ मोठे बॅनर लागले होते. सर्व प्रसार माध्यमे, चित्रपट सृष्टीतील इंग्रजीतील अनेक मॅक्झीन वर शिवशाहीर विजय तनपुरे हे नाव यायला लागले.आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवशाहीर विजय तनपुरे हे नाव परीचित होऊ लागले.

2001 साली माझ्यावर फार मोठा आघात झाला होता. मी दवाखान्यात अॅडमीट होतो माझा लहान भाऊ बाळूने मातोश्रीवर फॅक्स केला आणि 10 मिनिटांनी साहेबांच्या थापाचा फोन हॉस्पिटल मध्ये आला आणि नगर शहराचे तत्कालीन आमदार अनिल राठोड यांच्या मार्फत मला पैशाची मदत झाली.तर मी केव्हाच मेलो असतो म्हणून हा पुनर्जन्म हे बोनस मिळालेले आयुष्य समाजासाठी करतो आहे. येत्या काही वर्षांत शिर्डी येथे शिवाश्रम निर्मिती होतेय.

यामध्ये माझ्यासारख्या अपंगाना हक्काचे घर आणि काम दिले जाणार आहे. तसेच अनाथ, वृद्ध कलावंतां साठी हक्काचे घर आणि महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती चांगली नसणार्‍या कुठल्याही जाती धर्माच्या मुलामुलींना स्पर्धा परीक्षा चे संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी काम करत आहे.

नुकतेच शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांना दिल्ली युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. तसेच त्यांचे आजवर महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पोहोचविण्याचे कार्य करत आहे.

हा लेख आवडला असेल तर शेयर करायला विसरू नका, तुमच्याकडेही काही लेख असतील तर आम्हाला पाठवा आम्ही ते तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू !

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!