मुलींच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मदत करतील “या” टिप्स.

0

प्रेम ही भावना कुत्र्या-मांजरांपासून तर माणसापर्यंत सगळ्यांनाच असते. एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी नाती घट्ट करायला मदत करते आणि जेव्हा गोष्ट येते नाती घट्ट करण्याची तेव्हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट ओळखून घेणं. माणूस जर मनकवडा असला तर नात्यात नवनवीन फ्लेवरची भर पडत जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे मुलींच्या मनातल्या काही गोष्टी कश्या जाणून घ्यायच्या. जर तुमचं लग्न झालं असेल तर बायकोच्या मनातल्या, रिलेशनशिप असेल तर गर्लफ्रेंडच्या मनातल्या आणि जर सिंगल असशील तर तुझ्या क्रशच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायला मदत होईल.

Image Source: Google Image Source

स्त्रियांच्या मनातलं ओळखणं म्हणजे लय भारी काम बघा आणि यासाठी १०० वर्षांपासून पुरुषांची जात माती खात आहे. आजचा हे लेख वाचल्यावर तुमच्या आवडत्या स्त्रीच्या मनातील गुपित ओळखायला नक्की मदत होईल. मुलींच्या त्यांच्या साथीदाराकडून काही किमान अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्यास रिलेशनशीपमध्ये मुलींना समजून घेणं अवघड नाही.  मी सुद्धा अनुभवाचे बोल सांगतोय.

 

एकनिष्ठ: साथीदार कसाही जरी असला तरी तो आपल्याशी, आपल्या नात्याशी एकनिष्ठ असावा ही प्रत्येकच मुलीच्या मनातली इच्छा असते. खोटं बोलल्याने नात्यात दुरावे, रुसवे—फुगवे येऊ शकता. म्हणून पुरुषांनी एकनिष्ठ राहावं – तिच्याशी आणि तिच्यासोबत असलेल्या नात्याशी.

 

साधेपणा – मुलींना हवा असतो साथीदार जो तिच्या साधेपणाला किंमत देईल, तिच्या साधेपणाची तारीफ करेल आणि त्याला कमी लेखणार नाही. इथे साधा म्हणजे भोला नव्हे. स्वभावाने साधा म्हणजे त्यांच्या मनात कपट नसावं, वाईट सवयी नसाव्या. शांत आणि रोमॅन्टिक स्वभावाच्या मुलांसोबत राहणं त्यांना अधिक आवडत.

Image Sources: Google Image Search

वेळ देणारा – कोणत्याही नात्याला टिकविण्यासाठी द्यावा लागतो भरपूर वेळ आणि तो कितीदा किती वेळ देत आहेत त्यावरही अवलंबून असतं तुमचं नातं. मुलींना त्यांच्यासोबत वेळ घालवणारा आणि घालविलेल्या वेळाचे चीज करणारे जोडीदार हवा असतोच.

 

सत्यवादी –  आता इथे खरं बोलणारा मुलगा म्हणजे नेहमी खरंच बोलत रहावं असं काहीच नाही. काहीदा सरप्राइज साठी खोटंही बोलावं लागते. पण नातं जर खोट्यावर आधारित असेल तर फार काळ टिकत नाही. म्हणून खोटं बोलणं टाळाच.

 

प्रेम करणारा – सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही, तुमचं तिच्यावर प्रेम असावं. अमाप, खोलवर आणि नितळ. नात्यात प्रेम असलं तर ते उमलत जातं. फुलंत जातं.

 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा आणि आपली नाती टिकविण्यासाठी आपल्या मित्रांना मदत करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!