Loading...

मॉडेलिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली निर्भर महिला, जिचा खडतर जिवनप्रवास वाचुन तुमच्याही डोळ्यात पानी येईल !

3

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मॉडलेनिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारी देशातील पहिली निर्भर महिला,जिचे या क्षेत्रात नकळत पदार्पण झाल्यावर आणि ईंग्रजी भाषेवर निर्भर न राहता तिने मातृभाषेचा आदर विदेशातही कायम ठेवला. अशी शून्यातून विश्व निर्माण करणारी व समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करणारी अनिता विष्णू राठोड यांच्याशी आज संवाद साधण्याचा योग्य आला,आणि त्या खळखळत्या झऱ्या प्रमाणे नितळ बोलू लागल्या.

त्यांनी सांगितले की,माझ्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या की स्वप्नातही विचार केला नव्हता. प्रत्येक स्त्रीच्या विषयांमध्ये एक सुखी संसाराचे स्वप्न असते त्याचप्रमाणे मीही पाहत होते.मला जसा हवा होता तसा जोडीदार मिळाला होता स्वभावाने प्रेमळ आणि मनमिळावू अशा स्वभावाचा माझा जोडीदार होता.ऑफिसर म्हणून ते अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. उत्कृष्ट ऑफिसर म्हणून त्यांना ओळखले जात होते आणि आमच्या संसारांमध्ये दोन मुलीही होत्या.

Loading...

माझ्या जीवनात अशी एक वादळ आले की जे मी माझा संसार उद्ध्वस्त झाले,अकरा वर्षाच्या संसारांमध्ये कधीच न आजारी असणाऱ्या माझ्या नवऱ्याला अचानक ऑन ड्यूटी हार्ट अटॅक आला 16/4/2016 माझ्या मुलांचे वडील आणि माझा जोडीदार अचानक नाहीसा झाला.अचानक आलेल्या वादळामुळे जगण्याची इच्छाच संपून गेली होती.पण पोटामध्ये नऊ महिन्याचे बाळ होते.किती दुर्दैव आहे.प्रेमाने हात फिरवून आशीर्वाद देणारे त्याच्या वडिलांचे छत्र त्याच्या जवळ नव्हती.आयुष्य संपावी अशी इच्छा झाली आणि तसे प्रयत्नही केले.

पण नियतीला ते मान्य नव्हते. कारण माझे वयस्कर आई वडील आणि माझे सासू-सासरे त्यांच्या डोळ्यातील अश्रू काही कमी होत नव्हते.त्या वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांनी एकच प्रश्न केला की,आमचा विष्णू तो तर स्व इच्छे ने नाही गेेला,पण तू अशी का वागत आहेस तुझ्या पाठीशी तीन मुले आहेत त्यांना सांभाळ आणि आमच्याकडे पाहा.आम्ही वयोवृद्ध झालो आहोत आमच्या मध्ये आता शक्ती नाही तर तू तुझ्या मुलांचा सांभाळ कर,विष्णूने पाहिलेली तुमच्या संसाराची व तुमच्या मुलांचे स्वप्न तू पूर्ण कर.

आणि त्या दिवशी ठरवले की आता मरण्याचा विचार करायचा नाही जगून दाखवायचं अशी की जग जिंकायचे(जिंदगी ऐसे जियो के नाम बन जाए)नवीन जीवनाला सुरुवात केली.फोटोग्राफी हा आवडीचा छंद होता.माझ्या बर्थडेला विष्णूने DSLR कॅमेरा आणून दिलेला होता.फॅशन फोटोग्राफी शिकून त्यामध्ये आपला उदरनिर्वाह करायचा असा विचार होता.पण घर चालवण्यासाठी पैसा लागतो छंद नाही लागत म्हणून जॉब करण्याचा विचार केला.ग्रॅज्युएशन आणि टाइपिंग कम्प्युटर असल्यामुळे मला महाराष्ट्र उच्च शिक्षण संचालनालय पुणे ,येथे जॉब ही मिळाला.

आता जॉब करत करत फोटोग्राफी क्षेत्रांमध्ये नाव करायची इच्छा होती.आणि मनामध्ये जिद्द होती काहीतरी करून दाखवण्याची बालगंधर्व येथे एक एक्जीबिशन भरले त्यामध्ये माझ्या फोटोचे सेलेक्शन करण्यात आले,खूप आनंद झाला होता त्यावेळी आता फोटोग्राफी क्षेत्रांमध्ये करिअरची सुरुवात झालीच होती.पण म्हणतात ना जीवनामध्ये एक अशी वेळ येते की जीवन पालटून जाते तसेच माझ्यासोबत ही घडले.पी एस पी ग्रुप म्हणून पुण्यामधील प्रसिद्ध फोटोग्राफी ग्रुप आहे त्यामध्ये मी फोटोग्राफी शिकत असताना.

मॉडलिंग फोटो शूट चालू होती पण आहे वेळेस मॉडेल आली नाही.आणि सर्व फोटोग्राफर मित्रांची अग्र होती की मी मॉडेल म्हणून तिथे फोटोशूटसाठी बसावे आणि तसेच घडले.सर्वांनी माझे फोटो काढले आणि त्या वेळेस एकच सगळ्यांच्या तोंडातून निघाले मॅडम आपला फेस खरच फोटो जनी आहे आणि आपण मॉडलिंग क्षेत्रांमध्ये आपली करिअर करू शकता.पण एक मनामध्ये भीती होती की या क्षेत्राबद्दल थोडेसे गैरसमझ ऐकण्यात आलेले होते पण सध्याचे विधमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्जी फडणीस साहेब यांच्यापत्नी सविध पत्नी अमृताताई फडणवीस यांची एकदा मॉडलिंग क्षेत्राबद्दलची त्यांची मुलाखत ऐकली आणि माझ्याही मनात आले आपण का नाही या क्षेत्रात आपले नाव करावे,अमृताताईचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन मी एक पाऊल उचला.

अनेक ठिकाणी ऑडिशन दिले मुंबई मध्ये एक ऑडिशन झाली.हा त्या ठिकाणी मिस अँड मिसेस असे ब्युटी कॉन्टेस्ट ऑडिशन झाले होते.तिथून मला मेक मलिक यांचा फोन आला आणि माझ्या कानावर एक वाक्य पडले मॅडम इंटरनॅशनल साठी तुमची निवड झालेली आहे.कानावरती विश्वास बसत नव्हता पण हे खरे होते.आई-वडिलांना आणि सासू सरांना फोन केला मी मॉडलिंग साठी सिंगापूर येथे पार्टिसिपेट करणार आहे.पहिले तर सर्व काळजीपोटी मला नाही म्हणत होती पण त्यांना मी समजावल्यानंतर त्यांनी होकार दिला.

Loading...

आणि मग जिद्द आणि चिकाटी एकत्र करून मी सिंगापूरला गेले आणि तिथून सिंगापूर विनर होऊन आले. तिथे मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते.भारत म्हटले की विविधतेने नटलेला आपला समाज आहे.महाराष्ट्र म्हणजे की नऊवारी साडी या गोष्टी लक्षात घेतल्या जातात पण याच महाराष्ट्र मध्ये आणखीन एक जमात आहे ती म्हणजे बंजारा या बंजारा समाजातील मी अनिता राठोडज्या समाजाला तुच्छ लेखले जाते अशा समाजातील मी आजसातासमुद्रापलीकडे मी माझा जो बंजारा घागरा आहे याला रिप्रेझेंट केलं आणि तेथून ही मी विजेता ही झाली.

आणि आता माझी ग्लोबल वर्ल्ड फायनलिस्ट म्हणून साउथ अफ्रीका येथे निवड झाली आणि तिथे मी स्वाभिमानाने भारत देशाच प्रतिनिधित्व करून आपल्या देशाचे सातासमुद्रा पार नाव लौकीक केलेे.याचा मला सार्थ अभिमान आहे, याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे माझा समाज आणि माझ्या महाराष्ट्रातील अनेक लोक माझ्या पाठीशी आशीर्वाद रुपी उभे आहेत त्याच बरोबर मी एक जवाबदार आईचे कर्तव्य सुद्धा निभावत आहे,माझी मोठी मुलगी प्रीती…ही सुद्धा टायकंडो खेळत भारतीय खेळाडू आहे,तर दुसरी मुलगी लावण्या ही 5 वर्गात शिकत आहे,तर तिसरा मुलगा समर्थ हा चार वर्षाचा असून त्याला मी आपण मॉडेल करणार असल्याचे यावेळी सांगितले.

स्टोरी सौजन्य : अजय ढवळे, वाशिम

हा लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका ! तुमच्या कडे काही लेख असतील तर आम्हाला पाठवा तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

3 Comments
 1. Avatar
  shrikant rathod says

  Nyce khup chan ahe ani tumhi ankhi mothe vha ashi sant sevalal maharaj charni prarthna karto jay sevalal

 2. Avatar
  अर्जुन गोरे says

  खुपच अभिमानास्पद आयुष्य जगून नाव कमावले आहे
  आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आपणास
  खूप कीर्ती लाभो, व भविष्यात तुमच्या वाटेत येणारे अडथळे दूर हून तुमच्या आयुष्यात यश मिळो

 3. Avatar
  Parakash Rathod In Gulbharga Karnatka says

  Banjara Beti ki Shan

Leave A Reply

Your email address will not be published.